इस्लामाबाद: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील राजकीय संघर्ष वाढत आहे. दरम्यान, पाकिस्तानचे गृहराज्यमंत्री तलाल चौधरी यांनी मोठे विधान केले आहे. 'भारत कोणतीही चूक करणार नाही आणि जर त्यांनी चूक केली तर पाकिस्तान त्याला योग्य प्रतिउत्तर देईल,' असं तलाल चौधरी यांनी म्हटलं आहे. चौधरी म्हणाले की, जर भारताने कोणत्याही प्रकारचे साहस केले, तर त्यांच्या चुकीनंतर पाकिस्तानकडून देखील प्रत्युत्तर देईल जाईल.
तलाल चौधरी यांनी पुढे म्हटलं की, 'आम्हाला शांतता हवी आहे पण आम्ही कमकुवत नाही, आम्ही घाबरत नाही… अल्लाहच्या आदेशाने आम्हाला शांती हवी आहे की, हा भाग आणि संपूर्ण जग शांततेत राहावे, अन्यथा पाकिस्तानचे लोक आणि पाकिस्तानचे सैन्य अशा गोष्टी करण्याचे धाडस करणाऱ्यांचे तोंड दुसरीकडे वळवेल.'
हेही वाचा – भारताच्या कारवायांमुळे पाकिस्तानची उडाली घाबरगुंडी; आपत्कालीन CCI बैठक बोलावली
पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची धमकी –
याशिवाय, पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार यांनी देखील भारताला इशारा दिला. त्यांनी म्हटलं की, भारताने पाकिस्तानला कमकुवत समजू नये. भारताच्या प्रत्येक कृतीला आम्ही ताकदीने प्रत्युत्तर देऊ. भारताने कोणत्याही चुकीच्या स्थितीत राहू नये. आपल्यापैकी कोणत्याही गोष्टीला कमकुवतपणा मानू नये.
हेही वाचा – भारत-फ्रान्समध्ये 26 राफेल मरीन खरेदीचा करार; अणुबॉम्ब डागण्याची क्षमता असलेली विमाने
आम्ही योग्य उत्तर देण्यास तयार आहोत. पाण्याच्या प्रश्नावर आम्ही योग्य उत्तर देण्यास तयार आहोत. पण जर कोणी चुकीचा प्रयत्न केला तर त्याला माहित आहे की त्याला येथूनच उत्तर मिळेल, त्यामुळे तो पुन्हा असे करण्याचे धाडस करणार नाही, असंही अताउल्लाह तरार यांनी म्हटलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.