Boat Capsizes In River : बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रसावी, नदीच्या मधोमधच उलटली बोट; 50 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांमध्ये 40 लहान मुलांचा समावेश

नायजेरिया : वायव्य नायजेरियातील सोकोतो राज्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असलेली एक बोट नदीत उलटली. ज्यात किमान 50 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी पुष्टी स्थानिक अधिकाऱ्यांनी गुरुवारी केली. मिळालेल्या माहितीनुसार, या बोटीतून शेतात कामासाठी जाणारे लोक प्रवास करत होते. मात्र स्थानिक अधिकारी आणि रहिवाशांनी सांगितले की, मृतांमध्ये किमान 40 मुलांचा समावेश होता. 'नॅशनल इनलँड वॉटरवेज ऑथॉरिटी'चे (National Inland Waterways Authority) क्षेत्रीय […]

Boat Capsizes In River : बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रसावी, नदीच्या मधोमधच उलटली बोट; 50 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांमध्ये 40 लहान मुलांचा समावेश

नायजेरिया : वायव्य नायजेरियातील सोकोतो राज्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असलेली एक बोट नदीत उलटली. ज्यात किमान 50 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी पुष्टी स्थानिक अधिकाऱ्यांनी गुरुवारी केली. मिळालेल्या माहितीनुसार, या बोटीतून शेतात कामासाठी जाणारे लोक प्रवास करत होते. मात्र स्थानिक अधिकारी आणि रहिवाशांनी सांगितले की, मृतांमध्ये किमान 40 मुलांचा समावेश होता. 'नॅशनल इनलँड वॉटरवेज ऑथॉरिटी'चे (National Inland Waterways Authority) क्षेत्रीय व्यवस्थापक अब्दूलकादिर युसूफ यांनी 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात सांगितले की, "आतापर्यंत मुलांचे सुमारे 40 मृतदेह सापडल्याची मी पुष्टी करू शकतो."

हेही वाचा : शेतकऱ्याचा रुबाब! लासूर स्टेशन बाजारात चक्क थार गाडीतून आणला 180 किलो कांदा; मिळाला 3,600 रुपयांचा भाव

समाईला गारबा या स्थानिक रहिवाशाने सांगितले की, मृतांमध्ये त्याच्या 13 वर्षीय नातीचाही समावेश होता. त्यांनी सांगितले की, त्यांनी किमान 42 मृतदेह मोजले असून त्यातील बहुतांश महिला आणि मुले होती. "पावसाळ्याच्या दिवसांत, बहुतांश महिला आणि मुले शेतात कामासाठी जातात," असे त्याने 'असोसिएटेड प्रेस'ला सांगितले. सोकोतो राज्यातील 'नॅशनल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सी'चे प्रवक्ते दाहिर कुरे यांनी एएफपी (AFP) या वृत्तसंस्थेला सांगितले की, बचावकार्य सुरू आहे. "आम्ही सध्या बोटीच्या अपघाताच्या ठिकाणी पोहोचलो आहोत आणि बचावकार्य सुरू केले आहे," असे त्यांनी सांगितले.

स्थानिक परिषदेचे माजी सदस्य इब्राहिम मुसा यांनी परिस्थिती "गंभीर" असल्याचे वर्णन केले आणि सांगितले, "आम्ही आधीच 46 मृतदेह दफन केले आहेत. तर आणखी पाच जणांचे मृतदेह नुकतेच नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत." नायजेरियामध्ये, विशेषतः पावसाळ्यात, बोटींचे जीवघेणे अपघात होणे ही सामान्य बाब आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असणे, बोटींची खराब देखभाल किंवा सुरक्षेच्या नियमांचे पालन न करणे यांमुळे दरवर्षी अनेक लोकांचा मृत्यू होतो. या वर्षी जानेवारीत, देशाच्या ईशान्येकडील योबे राज्यात अशाच प्रकारच्या एका अपघातात किमान 25 जणांचा मृत्यू झाला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number