Tiger School म्हणजे चक्क वाघोबांची शाळा! इथे वाघाच्या बछड्यांना दिलं जातं प्राथमिक ते पदवीपर्यंतचं शिक्षण… जाणून घ्या सविस्तर

या अनोख्या शाळांमध्ये मानवी हस्तक्षेपाला अजिबात वाव दिला जात नाही. त्यांना शिकार करायला शिकवले जाते.
Tiger School म्हणजे चक्क वाघोबांची शाळा! इथे वाघाच्या बछड्यांना दिलं जातं प्राथमिक ते पदवीपर्यंतचं शिक्षण… जाणून घ्या सविस्तर

Tiger Schools in India : 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी..' ही म्हण प्राण्यांच्या जीवनातही खरी ठरते. कोणत्याही प्राण्याच्या पिल्लाची आईपासून ताटातूट झाली किंवा दुर्दैवाने आईचा मृत्यू झाला तर अगदी दयनीय अवस्था होते. वाघाचे बछडेही याला अपवाद नाहीत.

अनाथ बछड्यांना प्राणीसंग्रहालयातील पिंजऱ्यात ठेवल्यास मानवी संपर्क वाढून त्यांचा जंगली स्वभाव नष्ट होतो. म्हणूनच त्यांना नैसर्गिक वातावरणात शिकारीचे धडे देऊन पुन्हा जंगलात सोडण्यासाठी या शाळा कार्य करतात. मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पातील 'घोरेला रीवाल्डिंग सेंटर' (Rewilding Centre) ही देशातील पहिलीच अशा प्रकारची शाळा आहे. याच्याच धर्तीवर आता पेंचमध्येही ही व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.  पूर्व पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रातील 7 एकर परिसरामध्ये ही विशेष व्यवस्था उभारण्यात आली आहे. येथे वाघांच्या बछड्यांना जंगलात स्वाभिमानाने जगण्यासाठी सक्षम बनवले जाते.

कडक सुरक्षा, गुप्त कॅमेरे अन् मानवी वासापासून पूर्णपणे दूर
या अनोख्या शाळांमध्ये मानवी हस्तक्षेपाला अजिबात वाव दिला जात नाही. बछड्यांवर नजर ठेवण्यासाठी उच्च दर्जाचे गुप्त कॅमेरे आणि उंचावर उभारलेले मचाण वापरले जातात. मानवी आवाज किंवा वास त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही, याची कडक दक्षता घेतली जाते. कडेकोट कुंपण असलेल्या घनदाट झाडी, गवत आणि मुबलक पाणी असलेल्या क्षेत्रात या पिल्लांची सोय केली जाते. सुरुवातीला वन अधिकारी या बछड्यांना मांसाचे लहान तुकडे खाण्यास देतात. त्यानंतर त्यांच्यासमोर जिवंत कोंबड्या आणि बकऱ्या सोडल्या जातात, ज्यामुळे त्यांच्यातील नैसर्गिक शिकारीची उपजत भावना जागृत होते.  

100 यशस्वी शिकारी अन् मानवी भीती; हीच वाघाची ‘पदवी’!
जसजसे हे बछडे मोठे होतात, तसतसे त्यांचे प्रशिक्षण अधिक कठीण केले जाते. लहान प्राण्यांनंतर त्यांच्यासमोर चितळ आणि सांबरासारखे मोठे प्राणी सोडले जातात. जेव्हा एखादा वाघ स्वतंत्रपणे मोठ्या प्राण्यांची शिकार करू लागतो आणि मानवी अस्तित्वाची भीती बाळगून दूर राहतो, तेव्हा तो 'पदवीधर' झाला असे गमतीने मानले जाते. जोपर्यंत एखादा वाघ शिकारीचे किमान 100 हून अधिक प्रयोग यशस्वी करत नाही, तोपर्यंत त्याचे शिक्षण पूर्ण मानले जात नाही. ही परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतरच त्याला मुक्त जंगलात सोडले जाते.  

हेही वाचा – Maharashtra Tiger Census 2026: महाराष्ट्रात वाघांची गर्जना! व्याघ्रगणनेत संख्या 600 पार; मेळघाटची मोठी झेप

राष्ट्रीय प्राधिकरणाची दखल आणि इतर अभयारण्यांमधील वाघांची संख्यावाढ
पेंचच्या या टायगर स्कूलच्या यशाची दखल राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (NTCA) देखील घेतली आहे. या केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेल्या वाघांना यवतमाळमधील पैनगंगा आणि बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात सोडण्यात आले आहे. या शाळेत लहानाची मोठी झालेल्या एका वाघिणीला पैनगंगा प्रकल्पात सोडल्यानंतर तिने अनेक नव्या बछड्यांना जन्म दिला, ज्यामुळे तेथील वाघांची संख्या वाढण्यास मोठी मदत झाली. यामुळे नैसर्गिक अन्नसाखळी आणि वन्यजीवांचे संतुलन राखण्यास मोठी मदत होत आहे.  

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि AI तंत्रज्ञानाची जोड
अनाथ बछड्यांचे संगोपन आणि निरीक्षण अधिक तंतोतंत व्हावे, यासाठी आता या केंद्राला अधिक अत्याधुनिक बनवण्याची योजना आखली जात आहे. येत्या काळात या टायगर स्कूलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून बछड्यांच्या वर्तनावर आणि हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.

हेही वाचा – Thailand Cheap Tour Package: स्वस्तात मस्त परदेशवारी पडली महागात; 3 भारतीयांचे अपहरण करून 70 लाखांची खंडणी मागितली

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version