Ration Card: आता रेशन कार्ड बनवण्यासाठी सरकारी कार्यालयांत रांगा लावण्याची गरज नाही. केंद्र सरकारने नागरिकांच्या सोयीसाठी एक मोठा निर्णय घेतला असून, उमंग (UMANG) या सरकारी ॲपद्वारे नागरिकांना घरबसल्या रेशन कार्डसाठी अर्ज करता येणार आहे. सरकारकडून देशातील प्रत्येक नागरिकाला अन्नधान्य आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड हे अत्यंत आवश्यक कागदपत्र आहे. परंतु आता ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल झाली आहे.
हेही वाचा – RBI Sachet Portal: डिजिटल व्यवहारात फसवणूक झाली? घाबरू नका! RBI च्या ‘सचेत’ पोर्टलवर करता येईल तक्रार
उमंग अॅपद्वारे रेशन कार्ड अर्ज करण्याची सोपी पद्धत
मोबाईलवर UMANG App डाउनलोड करा.
मोबाईल नंबर वापरून नोंदणी (Registration) करा.
होमपेजवरील Service विभागात जा.
Utility Services मध्ये ‘Apply Ration Card’ हा पर्याय निवडा.
राज्य निवडून आवश्यक वैयक्तिक माहिती भरा — नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, पत्ता इत्यादी.
मागितलेली कागदपत्रे अपलोड करा आणि Submit वर क्लिक करा.
हेही वाचा – Aadhaar ATM: आधार एटीएम म्हणजे काय? तुमचे वॉलेट हरवल्यास पैसे काढण्यासाठी त्याचा कसा वापर करावा?
सध्या या सुविधेचा लाभ चंदीगड, लडाख आणि दादरा-नगर हवेली येथील नागरिकांना मिळू शकतो. लवकरच ही सेवा देशभर उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे. रेशन कार्ड हे फक्त अन्नधान्य वितरणासाठीच नव्हे, तर सरकारी योजना, शिष्यवृत्ती, गॅस सबसिडी, निवास योजना आदींचा लाभ घेण्यासाठीही आवश्यक आहे. या कार्डात कुटुंबातील सदस्यांची संख्या, पत्ता आणि वैयक्तिक माहिती नमूद केली जाते. सरकारच्या या डिजिटल उपक्रमामुळे आता नागरिकांना त्रासदायक प्रक्रियेतून सुटका मिळणार आहे. तसेच रेशन कार्ड अर्जाची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.