RBI Junio Payments: भारत आता डिजिटल पेमेंटच्या नव्या युगात प्रवेश करणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जुनियो पेमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड (Junio Payments Private Limited) ला डिजिटल वॉलेट सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या नव्या उपक्रमामुळे बँक खाते नसलेले वापरकर्ते अगदी लहान मुलंसुद्धा UPI पेमेंट्स करू शकतील. देशभरात लहान दुकानांपासून मोठ्या मॉलपर्यंत UPI पेमेंट्सचा वापर वाढला आहे. आतापर्यंत या सुविधेसाठी बँक खाते आवश्यक होते. पण आता Junio नावाचे UPI-लिंक्ड डिजिटल वॉलेट लाँच केल्याने, बँक खाते नसतानाही QR कोड स्कॅन करून व्यवहार करता येणार आहेत.
मुलांसाठी जुनियो पेमेंट्स ॲप लाँच
अंकित गेरा आणि शंकर नाथ यांनी विकसित केलेले हे ॲप लहान मुले आणि तरुणांसाठी तयार करण्यात आले आहे. या ॲपचा उद्देश मुलांना पैसे जबाबदारीने खर्च करणे, बचत करणे आणि आर्थिक शिस्त शिकवणे आहे. पालक आपल्या मुलांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतात आणि त्यावर खर्च मर्यादा निश्चित करू शकतात.
हेही वाचा – Digital Gold Alert : डिजिटल सोन्यात गुंतवणूक करतायं?; आधी SEBI ने दिलेला 'हा' इशारा नक्की वाचा
ॲपची मुख्य वैशिष्ट्ये
बँक खाते नसतानाही UPI पेमेंट्स करण्याची सुविधा
UPI QR कोड स्कॅन करून पेमेंट करण्याची सोय
NPCI च्या UPI सर्कल उपक्रमाशी जोडलेले वॉलेट
टास्क रिवॉर्ड्स, सेव्हिंग गोल्स सारखी वैशिष्ट्ये
पालकांसाठी कंट्रोल आणि ट्रॅकिंग सिस्टम
सध्या देशभरातील 2 मिलियनहून अधिक मुलं आणि तरुण हे ॲप वापरत आहेत. RBI च्या या नव्या निर्णयामुळे डिजिटल पेमेंटचा वापर अधिक व्यापक होईल आणि लहान वयापासून मुलांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवण्यास मदत होईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.