Nepal China Border: नेपाळवरील संकट अजून टळलेलं नाही! ग्लेशियर सरोवर ओव्हरफ्लो; पुढची 90 मिनिटं ठरणार अत्यंत निर्णायक

नेपाळ चीन सीमेवर ग्लेशियर कोसळल्याने तयार झालेल्या सरोवरातून पाणी बाहेर पडू लागलं आहे. संभाव्य महापुराचा धोका पाहता पुढील 90 मिनिटे महत्त्वाची ठरणार आहेत.

Nepal China Border: नेपाळवरील संकट अजून टळलेलं नाही! ग्लेशियर सरोवर ओव्हरफ्लो; पुढची 90 मिनिटं ठरणार अत्यंत निर्णायक

नेपाळ: नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरानंतर परिस्थिती पूर्वपदावर येण्याआधीच आणखी एका संकटाची चाहूल लागली आहे. नेपाळ आणि चीनच्या सीमेवर हिमनदीचा भाग कोसळल्याने तयार झालेल्या जलसाठ्यामुळे पुन्हा मोठ्या पुराचा धोका निर्माण झाला आहे. या नैसर्गिक सरोवरातून पाणी बाहेर पडू लागल्याने दोन्ही देशांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ग्लेशियरचा मोठा भाग तुटून खाली कोसळल्यानंतर सीमेवरील भागात मोठ्या प्रमाणात दगड, बर्फ आणि मातीचा ढिगारा जमा झाला. त्यामुळे नदीचा प्रवाह काही काळ रोखला गेला आणि त्यातून तात्पुरता जलसाठा तयार झाला. आता या सरोवरातील पाणी काठावरून बाहेर पडत असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी खालील भागातील नद्यांची पाणीपातळी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Nepal Flood: भूकंप की हिमस्खलन? नेपाळमधील भोटे कोशी नदीतील विनाशकारी महापुराचे गूढ काय? मोठी अपडेट समोर

या परिस्थितीवर चीनकडूनही बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. चीनच्या सरकारी माध्यमांनी पुढील दीड तास अत्यंत महत्त्वाचा असल्याचं सांगितलं आहे. सरोवराचा नैसर्गिक अडथळा अचानक तुटल्यास मोठ्या वेगाने पाणी आणि मलबा खालच्या भागात पोहोचू शकतो. त्यामुळे नेपाळमधील नदीकाठच्या परिसरात पुन्हा पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.

धोका लक्षात घेऊन नेपाळी सुरक्षा यंत्रणांनी बचाव पथकांच्या हालचालींवर तात्पुरती मर्यादा आणली आहे. काही भागांमध्ये बचावकार्य थांबवून परिस्थितीचा अंदाज घेतला जात आहे. बचाव पथकांबरोबरच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेलाही प्राधान्य दिलं जात आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने कोणतीही जोखीम न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, चीनच्या पाहणीनुसार या तयार झालेल्या सरोवरात 25 लाख घनमीटरपेक्षा जास्त पाणी साचलं असल्याचा अंदाज आहे. याआधी करण्यात आलेल्या अंदाजापेक्षा हा साठा अधिक असल्याचं समोर आलं आहे. आगामी काही दिवसांत आणखी मोठ्या प्रमाणात पाणी या भागात जमा होऊ शकतं, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा: Sichuan Earthquake: नेपाळनंतर आता चीन हादरला; सिचुआन प्रांतात 5.1 तीव्रतेचा भूकंप; नागरिकांची प्रचंड धावपळ

विशेष म्हणजे, या जलसाठ्याचं प्रमाण प्रचंड असल्याने संभाव्य धोका कमी लेखता येणार नाही. जर नैसर्गिक अडथळा अचानक फुटला, तर पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात दगड, चिखल आणि मलबा वाहून जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आधीच पुराचा फटका बसलेल्या भागांमध्ये नव्याने संकट निर्माण होऊ शकतं.

सध्या नेपाळ आणि चीनमधील संबंधित यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. आधीच्या प्रलयामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झालेली असताना आता या नव्या जलसाठ्यामुळे चिंता आणखी वाढली आहे.

पुढील काही तासांमध्ये सरोवरातील पाण्याची पातळी, नैसर्गिक अडथळ्याची स्थिती आणि नदीच्या प्रवाहातील बदल यावर संपूर्ण परिस्थिती अवलंबून आहे. त्यामुळे नेपाळसह सीमावर्ती भागातील नागरिक आणि बचाव यंत्रणांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number