नेपाळ : तिबेट सीमेजवळील रसुवा भागात आज, बुधवारी सकाळी ‘भोटे कोशी’ नदीला अचानक पूर आल्यामुळे सुमारे 500 लोकं बेपत्ता झाले आहेत. यामध्ये 100 हून अधिक भारतीयांचा समावेश आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुराचा तडाखा बसलेल्या भागांतून आतापर्यंत 95 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यांनी सांगितले की, बाधित क्षेत्रातील विविध भागांतून किमान 93 जणांची सुटका करण्यात आली आहे. नेपाळमधील भारतीय दूतावासाने या घटनेमुळे प्रभावित झालेल्या भारतीय नागरिकांविषयी माहिती मिळवण्यासाठी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक सुरू केले आहेत. दरम्यान, हिमालयातील या देशात आलेल्या विनाशकारी अचानक पुरामुळे किमान 95 जणांचा मृत्यू झाला आणि शेकडो लोक बेपत्ता झाले आहेत, या पार्श्वभूमीवर नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांनी एकता आणि संयम राखण्याचे आवाहन केले.
आपत्कालीन क्रमांक –
+977 985 131 6807
+977 970 910 7500
Embassy of India in Nepal has set up emergency helpline numbers for information on Indian nationals impacted by it. ????????? ???????: +977 985 131 6807
+977 970 910 7500@IndiaInNepal | #NepalFloods | #Nepal pic.twitter.com/VRGk48T8DR — All India Radio News (@airnewsalerts) August 26, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 28 पोलीस कर्मचारीही या पूरात बेपत्ता आहेत. पुरामुळे रस्ते, जलविद्युत प्रकल्प आणि दूरसंचार नेटवर्कसह इतर महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. शोध आणि बचाव कार्यासाठी नेपाळचे सैन्य आणि खाजगी कंपन्यांच्या 30 हून अधिक हेलिकॉप्टर्सना तैनात करण्यात आले होते. परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी दुपारी संसदेला माहिती दिली की, डझनभर सुरक्षा कर्मचारी आणि सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकलेला नाही. संपर्क तुटलेल्यांमध्ये रसुवा येथील नेपाळ पोलीस आणि ‘आर्म्ड पोलीस फोर्स’चे 26 जवान, तसेच तिमुरे आणि मैलुंग येथे तैनात असलेल्या नेपाळ सैन्याच्या 44 जवानांचा समावेश होता. याव्यतिरिक्त, रसुवागढी येथील काही सीमाशुल्क व इमिग्रेशन अधिकारी आणि बाधित क्षेत्रांतील काही नागरिकही बेपत्ता होते. नेपाळ पर्यटन मंडळाने सांगितले की, बाधित क्षेत्रांमध्ये 291 परदेशी नागरिक आणि 93 नेपाळी नागरिकांसह एकूण 384 पर्यटक बेपत्ता झाल्याचे किंवा त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याचे वृत्त आहे. या प्राथमिक यादीत 105 भारतीय नागरिकांचा समावेश होता. या माहितीची पडताळणी आणि खातरजमा ट्रॅव्हल एजन्सी, मार्गदर्शक (गाईड्स), स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा यांच्यामार्फत केली जात होती.