नवी दिल्ली: दिल्लीहून इस्रायलची राजधानी तेल अवीवला जाणारे एअर इंडियाचे विमान अबू धाबीकडे वळवण्यात आले आहे. तेल अवीव बेन गुरियन विमानतळावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. येमेनच्या हुथी बंडखोरांनी बेन गुरियन विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला केला. क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे धुराचे लोट उठताना दिसले. यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली. विमानतळावरील क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर अनेक विमानांचे उड्डाण वळवावे लागले. यामध्ये एअर इंडियाच्या फ्लाइट AI139 चाही समावेश आहे.
फ्लाइट AI139 अबू धाबीकडे वळवण्यात आली –
आज सकाळी बेन गुरियन विमानतळावर घडलेल्या घटनेनंतर 3 मे 2025 रोजी दिल्लीहून तेल अवीवला जाणारे एअर इंडियाचे विमान AI139 अबू धाबीकडे वळवण्यात आले, असे एअर इंडियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. या विमानाचे अबू धाबीमध्ये सामान्य लँडिंग करण्यात आले.
6 मे पर्यंत विमानसेवा बंद –
एअर इंडियाने निवेदनात नमूद केलं आहे की, तेल अवीवला जाणारी उड्डाणे स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आमच्या प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, तेल अवीवला जाणारी आणि तेथून येणारी उड्डाणे तात्काळ 6 मे 2025 पर्यंत स्थगित करण्यात येतील. आमचे कर्मचारी ग्राहकांना मदत करत आहेत आणि त्यांना पर्यायी व्यवस्था करण्यास मदत करत आहेत.
हेही वाचा – पाकिस्तानचा थरकाप! राष्ट्रपतींनी मध्यरात्री बोलावले संसदेचे आपत्कालीन अधिवेशन
क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विमान सेवा विस्कळीत –
रविवारी येमेनच्या इराण समर्थित बंडखोरांनी डागलेल्या क्षेपणास्त्रामुळे इस्रायलच्या मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ बेन गुरियनवरील उड्डाणे सुमारे एक तासासाठी विस्कळीत झाली. येमेनच्या हुथी बंडखोरांनी डागलेल्या क्षेपणास्त्रामुळे धुराचे लोट उठताना दिसले. गाझा युद्धादरम्यान पॅलेस्टिनींशी एकता दर्शवण्यासाठी हुथी बंडखोर इस्रायलवर हल्ले करत आहेत. रविवारी हुथी बंडखोरांनी डागलेल्या क्षेपणास्त्रानंतर इस्रायलच्या अनेक भागात हवाई हल्ल्याचे सायरन वाजले.
An Israeli Air Force security source, regarding the missile strike from Yemen on Ben Gurion Airport in Tel Aviv, said: "It appears to be either a mistake by the air defense systems or a major interception failure. The matter is still under investigation." pic.twitter.com/UjjZ9GJGEM — Alice Williams (@aDemCalledAlice) May 4, 2025
हेही वाचा – अमेरिका आणि भारत भूकंपाचे धक्के! 3 ते 5.4 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली तीव्रता
इस्रायली माध्यमांनी प्रसारित केलेल्या छायाचित्रांनुसार, विमानतळावर धुराचे लोट दिसत होते. फोटोंमध्ये प्रवासी आश्रयासाठी पळताना दिसत आहेत. हल्ल्यानंतर हवाई, रस्ते आणि रेल्वे वाहतूक थांबवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. इस्रायल विमानतळ प्राधिकरणाने सांगितले की सुमारे एक तासानंतर वाहतूक पुन्हा सुरू झाली. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी विमानतळावरील हल्ल्याचा बदला घेण्याचे आवाहन केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.