Air Travel Become Expensive: मनोरंजन क्षेत्रातील कलाकार आणि गायक हे कार्यक्रमांसाठी सतत प्रवास करत असतात. वेळेचे बंधन आणि कार्यक्रमांचे कडक वेळापत्रक पाहता ते बहुतेकदा विमान प्रवासालाच प्राधान्य देतात. परंतु देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोच्या मोठ्या ऑपरेशनल बिघाडाचा फटका एका मराठी गायकाला मोठ्या प्रमाणावर बसला आहे.
गोव्याहून मुंबईसाठी 4.20 लाखांची ‘डोमेस्टिक’ तिकिटे
प्रसिद्ध मराठी गायक राहुल वैद्य याने त्याच्या इंस्टाग्रामवर विमान प्रवासाशी संबंधित काही फोटो आणि बोर्डिंग पास शेअर करत आश्चर्यकारक खुलासा केला. गोव्याहून मुंबईपर्यंतच्या प्रवासासाठी त्याला तब्बल 4.20 लाख रुपये मोजावे लागले. एका स्टोरीमध्ये राहुलने डोक्याला हात लावलेला फोटो शेअर केला. त्याखाली त्याने लिहिले, 'आजचा टेकऑफ माझ्यासाठी सर्वात वाईट दिवस ठरला. उद्या रात्री आमचा कोलकात्यात शो आहे आणि अजूनही आम्ही तिथे कसे पोहोचणार आहोत काहीच माहिती नाही.' दुसऱ्या स्टोरीमध्ये त्याने आश्चर्यकारक माहिती देत म्हटले, 'हे बोर्डिंग पास 4.20 लाखांचे आहेत… आणि तेही फक्त मुंबईपर्यंत! आता मुंबई-कोलकाता हा पूर्ण वेगळा खर्च. माझ्या आयुष्यातील सर्वात महागडी डोमेस्टिक ट्रिप!'
हेही वाचा – Rinku Rajguru : 'आशा' पुसणार 'आर्ची'ची इमेज? रिंकू राजगुरूच्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज
देशभरातील फ्लाइट्स उशिरा
गेल्या तीन दिवसांपासून इंडिगो एअरलाइन्सची ऑपरेशनल प्रणाली कोलमडली असून, शेकडो टेकऑफ रद्द किंवा विलंबाने होत आहेत. 24 तासांत तब्बल 550 फ्लाइट्स रद्द झाल्या असून देशभरातील विमानतळांवर मोठा गोंधळ उडाला आहे. याच गोंधळाचा फटका राहुल वैद्यला बसला आहे.
राहुलने सांगितला संपूर्ण त्रासदायक अनुभव
त्याने इंडिगोवर नाराजी व्यक्त करत म्हटले की, 'इंडिगो सारखा मार्केट लीडर इतका अनप्रोफेशनल कसा? प्रवाशांना इतकं गृहीत कसं धरतात? काम संपल्यावर मी नक्कीच तक्रार करेल.' अखेर राहुल रात्री 10 वाजता कोलकात्यात पोहोचला, 11 वाजता शो केला आणि रात्री 1 वाजता स्टेजवरून परत एअरपोर्टवर निघाला. त्याचा हा ‘शॉर्ट स्टे’ कधीही न विसरण्यासारखा असल्याचे त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.