Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आठवा दिवस, पुन्हा उपचार घेणं सोडलं; सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

विजय चिडे, प्रतिनिधी  अंतरवाली सराटी-जालना :  मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली असून जोपर्यंत सरकार सगळ्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भूमिका जरांगे पाटलांची मांडली आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी कालपासून उपचार घेणे पुन्हा […]

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आठवा दिवस, पुन्हा उपचार घेणं सोडलं; सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

विजय चिडे, प्रतिनिधी 

अंतरवाली सराटी-जालना :  मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली असून जोपर्यंत सरकार सगळ्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भूमिका जरांगे पाटलांची मांडली आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी कालपासून उपचार घेणे पुन्हा सोडले असल्याची माहिती समोर येत आहे. पाणी आणि सलाईन तसेच तपासणीदेखील त्यांनी बंद केली आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आता काही घेणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे. 

हेही वाचा : Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द, नगरविकास विभागाकडून अधिसूचना जारी; सहा वर्षे निवडणूक लढविण्यासही बंदी

मागण्याची अंमलबजावणी करा त्यानंतरच उपचार घेणार, असा मनोज जरांगे यांचा पवित्रा आहे. सरकार 58 लाख नोंदी सुरू करतो म्हणाले. पण अजून त्याचं काम सुरू झालेलं नाही. हैदराबाद गॅझेटचं काम सुरू केलं नाही. गावात दवंड्या पिटतो म्हणाले की, ते काही केलं नाही. हैदराबाद गॅझेटनुसार व्हॅलिडिटी द्यायची असली तर 2012 च्या कायद्यात जातपडताळणी कायद्यात हैदराबाद, सातारा आणि कोल्हापूर गॅझेटचा समाविष्ट करण्यासाठी मुख्यमंत्री यांना बोलतो, असं शिष्टमंडळ म्हणाले होते. यासाठी मुख्यमंत्री यांना बोलतो म्हणाले होते. मात्र अद्याप शिष्टमंडळ का बोलले नाही? हैदराबाद गॅझेटच्या व्हॅलिडिटीचा प्रश्न मिटेल, असे जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, आज सकाळी डॉक्टरांचे पथक उपोषणस्थली दाखल झाले असताना मनोज जरांगे यांनी तपासणी नाकारली असल्याचे पाहायला मिळाले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number