Lagron Group India : ग्रामीण भागातील जलसुरक्षेला बळकटी; लग्रों समूह इंडियाने पूर्ण केला नाशिकमधील बंधारा प्रकल्प

नाशिक : 25 ऑगस्ट पर्यावरणीय शाश्वतता आणि सामाजिक विकासाप्रती असलेल्या आपल्या सातत्यपूर्ण बांधिलकीचा एक भाग म्हणून लग्रों समूह इंडियाने भारतकेअर्स (सीएसआरबॉक्स समूह) यांच्या भागीदारीत नाशिक जिल्ह्यातील शास्त्रीनगर गावात बंधाऱ्याचे बांधकाम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. पाण्याची टंचाई दूर करणे, जमिनीतील जलसाठे बळकट करणे आणि या भागातील शेतकरी समुदायांची पाणीटंचाईला तोंड देण्याची क्षमता वाढवणे या उ‌द्देशाने कंपनीच्या […]

Lagron Group India : ग्रामीण भागातील जलसुरक्षेला बळकटी; लग्रों समूह इंडियाने पूर्ण केला नाशिकमधील बंधारा प्रकल्प

नाशिक : 25 ऑगस्ट पर्यावरणीय शाश्वतता आणि सामाजिक विकासाप्रती असलेल्या आपल्या सातत्यपूर्ण बांधिलकीचा एक भाग म्हणून लग्रों समूह इंडियाने भारतकेअर्स (सीएसआरबॉक्स समूह) यांच्या भागीदारीत नाशिक जिल्ह्यातील शास्त्रीनगर गावात बंधाऱ्याचे बांधकाम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. पाण्याची टंचाई दूर करणे, जमिनीतील जलसाठे बळकट करणे आणि या भागातील शेतकरी समुदायांची पाणीटंचाईला तोंड देण्याची क्षमता वाढवणे या उ‌द्देशाने कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या उपक्रमांतर्गत हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. या प्रकल्पाचा लाभ शास्त्रीनगर आणि गंगाम्हाळुंगी या दोन्ही गावांतील रहिवाशांना होण्याची अपेक्षा आहे. या गावांमध्ये विशेषतः कोरड्या हंगामात पाण्याची उपलब्धता ही दीर्घकाळापासूनची समस्या राहिली आहे. या प्रकल्पाच्या उ‌द्घाटन समारंभाचे नेतृत्व लग्रों समूह इंडियाचे सी ओ ओ, श्री. दीपक पाटील आणि लग्रों समूह इंडियाच्या सीएसआर प्रमुख सुश्री आबिदा अनीस यांनी केले. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांचे वरिष्ठ प्रतिनिधी, समुदायाचे नेते, प्रकल्पाची अंमलबजावणी करणारे भागीदार तसेच स्थानिक समुदायातील सदस्य उपस्थित होते.

दुष्काळप्रवण भागात उभारण्यात आलेल्या या बंधाऱ्यामुळे पाण्याची घटती पातळी आणि पावसाच्या अनियमित पद्धतीमुळे शेतीचे उत्पादन आणि घरगुती पाण्याची उपलब्धता यावर होत असलेल्या परिणामांना काही प्रमाणात आळा घालण्यास मदत होणार आहे. नुकत्याच पूर्ण झालेल्या या बंधाऱ्यात 94 लाख लिटरपेक्षा अधिक पाणी साठवण्याची क्षमता निर्माण झाली असून, हा साठा वर्षातून अंदाजे दोन वेळा भरला जाण्याची अपेक्षा आहे. तसेच, या प्रकल्पामुळे दरवर्षी 8.32 लाख लिटरपेक्षा अधिक जमिनी खाली असलेल्या पाण्याचे पुनर्भरण होण्याची क्षमता निर्माण झाली आहे. या बंधाऱ्यामुळे पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी आणि सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे स्थानिक नागरिकांच्या उपजीविकेला अधिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल आणि शेतकरी कुटुंबांना हंगामी पाणीटंचाईचा अधिक प्रभावीपणे सामना करता येईल. या प्रकल्पाचा दोन्ही गावांतील 3,650 पेक्षा अधिक लाभार्थीना सकारात्मक लाभ होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा : Gold Price Prediction : सोन्याचे दर कमी होणार की वाढतच जाणार? जाणून घ्या माइनिंग रिपोर्टच्या माध्यमातून सोने खरेदीचा पुढचा ट्रेंड

या उपक्रमातून दीर्घकालीन आणि शाश्वत विकासाला चालना देणाऱ्या, तसेच पर्यावरणीय व सामाजिकदृष्ट्या दीर्घकाळ सकारात्मक परिणाम घडवून आणणाऱ्या सामुदायिक साधनसुविधांची निर्मिती करण्याचा लग्रों समूह इंडियाचा दीर्घकालीन दृष्टिकोन अधोरेखित होतो. जलसंधारणाच्या या संरचनेच्या बांधकामासोबतच, स्थानिक भागधारकांचा सहभाग आणि त्यांची क्षमता वाढविण्यासाठीही विविध उपक्रम राबविण्यात आले. यामुळे पाण्याचे जबाबदारीने व्यवस्थापन करण्यास तसेच स्थानिक समदायाच्या सहभागातन आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने या जलसंधारण सुविधेची दीर्घकालीन देखभाल सुनिश्चित करण्यास मदत होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना लग्रों समूह इंडियाच्या सीएसआर आणि शाश्वतता विभागाच्या प्रमुख अबिदा अनीस म्हणाल्याः "पाणी हे समुदाय, उपजीविका आणि परिसंस्थांसाठी अत्यंत महत्त्वाचे संसाधन आहे. लग्रोंमध्ये आमचा विश्वास आहे की, अत्यावश्यक संसाधनांची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि अनेक पिढ्यांपर्यंत समुदायाच्या उपयोगी पडतील अशा पायाभूत सुविधा निर्माण करणे, हीच शाश्वत विकासाची सुरुवात आहे. या बंधाऱ्याचे पर्णत्व हे केवळ जलसंधारणाच्या दृष्टीने केलेले काम नाही, तर शेतीची हवामान बदलांना तोंड देण्याची क्षमता वाढवणे, पर्यावरणाचे संवर्धन करणे आणि ग्रामीण कुटुंबांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्याची क्षमता बळकट करणारे, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणारे आणि स्थानिक पातळीवर अर्थपूर्ण सकारात्मक बदल घडवून आणणारे उपक्रम राबविण्यासाठी आम्ही सातत्याने कटिबद्ध आहोत."

स्थानिक समुदायासाठी हा प्रकल्प केवळ पायाभूत सुविधा उभारण्यापुरता मर्यादित नसून, अधिक स्थैर्य आणि शेतीच्या उत्पादनात सुधारणा होण्याच्या आशेचा किरण ठरला आहे. गंगाम्हाळुंगी गावातील शेतकरी छगन दिवे यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितलेः "दरवर्षी हिवाळ्यानंतर पाण्याची टंचाई जाणवू लागते. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असला तरी पाणी वाहून जात असल्याने आमच्या शेतजमिनी आणि पशुधनासाठी पाण्याची व्यवस्था करणे कठीण होते. उन्हाळ्यात अनेक कुटुंबांना पाण्यासाठी तब्बल 5 किमीपर्यंत जावे लागत होते. हा बंधारा आमच्यासाठी वरदान ठरला आहे. यामुळे आमच्या शेतांसाठी पाण्याची विश्वासार्ह उपलब्धता निर्माण झाली असून अनेक कुटुंबांना भेडसावणारी पाण्याची अनिश्चितताही कमी होणार आहे. या सहकार्याबद्दल आणि आमच्या गावाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या या उपक्रमाबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत."

हा प्रकल्प जबाबदारीने जलव्यवस्थापन आणि पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी लग्रों इंडियाकडून राबविण्यात येत असलेल्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीने जलसंधारण,नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन, जमिनी खालील पाण्याचे पुनर्भरण आणि शाश्वत ग्रामीण विकासावर केंद्रित अनेक उपक्रम राबविले आहेत. जलसुरक्षा ही समुदायाचे कल्याण आणि आर्थिक विकासासाठी मूलभूत गरज असल्याचे लक्षात घेऊन, पाण्याच्या संसाधनांचे संवर्धन करण्यासोबतच हवामानाशी संबंधित आव्हानांना सामोरे जाण्यासाठी स्थानिक समुदायांची क्षमता बळकट करणाऱ्या उपक्रमांना लग्रों सातत्याने पाठिंबा देत आहे.

हेही वाचा : IPS Transfer: पोलीस प्रशासनात मोठा फेरबदल! 4 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

शास्त्रीनगर बंधाऱ्याचे पूर्णत्व हा कंपनीच्या शाश्वत विकासाच्या प्रवासातील आणखी एक महत्वाचा टप्पा आहे. दरवर्षी लाखो लिटर पाण्याचा साठा आणि जमिनी खालील पाण्याचे पुनर्भरण करण्याची क्षमता असलेली टिकाऊ जलसंधारण सुविधा निर्माण करून लग्रों समूह इंडिया केवळ पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठीच नव्हे, तर शेतीची उत्पादकता वाढविणे, ग्रामीण समुदायांच्या उपजीविकेला अधिक बळकटी देणे आणि कंपनीच्या कार्यक्षेत्रातील समुदायांसाठी अधिक शाश्वत भविष्य घडविण्यासाठीही योगदान देत आहे.

लग्रों समूह इंडियाविषयी

लग्रों समूह इंडिया ही विद्युत आणि डिजिटल इमारत पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील आघाडीची विशेषीकृत कंपनी आहे. आपल्या सीएसआर उपक्रमांद्वारे कंपनी शिक्षण, आरोग्यसेवा, कौशल्य विकास, पर्यावरणीय शाश्वतता, जलसंधारण आणि समुदाय विकास या क्षेत्रांतील विविध कार्यक्रमांना पाठिंबा देते. या माध्यमातून संपूर्ण भारतात दीर्घकालीन आणि सकारात्मक परिणाम घडवून आणण्यासाठी कंपनी कार्यरत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number