mAadhaar vs e-Aadhaar App : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने नुकतेच ई-आधार ॲप (e-Aadhaar App) नावाचे एक नवीन मोबाइल ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे, जे अँड्रॉइड आणि आयओएस (iOS) दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे नवीन ॲप जुन्या एम-आधार ॲप (mAadhaar App) च्या तुलनेत अनेक नवीन आणि सुधारित वैशिष्ट्यांसह आले आहे. सरकारी कामे सोपी करण्यासाठी आणि दस्तऐवजांची तपासणी अधिक सुरक्षित, सोपी आणि पेपरलेस (Paperless) करण्यासाठी हे नवीन ॲप आणले गेले आहे. मात्र, या नवीन ॲपच्या लॉन्चिंगमुळे ई-आधार ॲप आणि एम-आधार ॲपमध्ये नेमका काय फरक आहे आणि ते कशासाठी वापरले जातात, याबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
UIDAI चे स्पष्टीकरण आणि दोन्ही ॲप्सचा उद्देश
यूआयडीएआयने आपल्या 'एक्स' (X) हँडलवर या नवीन ॲपबद्दल माहिती दिली. हे ॲप 'स्मार्ट, सुरक्षित आणि पेपरलेस' असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा नवीन ई-आधार ॲप जुन्या एम-आधार ॲपची जागा घेणार नाही. दोन्ही ॲप्सची उद्दिष्ट्ये वेगवेगळी आहेत.
mAadhaar ॲप : हे ॲप सुरुवातीला 'मोबाइल-फर्स्ट प्लॅटफॉर्म' म्हणून आधार संबंधित सेवांच्या व्यवस्थापनासाठी (Management) तयार करण्यात आले होते.
e-Aadhaar ॲप : हे नवीन ॲप डिजिटल ओळखीचा सुरक्षित आणि व्यापक वापर वाढवण्यासाठी लॉन्च करण्यात आला आहे. दोन्ही ॲप्स आपापल्या उद्देशासाठी उपयोगी असून, ते एकमेकांचे पूरक म्हणून काम करतील.
एम-आधार ॲपची वैशिष्ट्ये
एम-आधार ॲप हे यूआयडीएआयने लॉन्च केलेले पहिले मोबाइल ॲप्लिकेशन होते. आधार संबंधित अनेक महत्त्वाच्या सेवांचा वापर या ॲपद्वारे करता येतो.
सेवा: तुम्ही तुमच्या आधार कार्डची पीडीएफ प्रत डाउनलोड करू शकता. एक विशेष ओळख क्रमांक, ज्याला व्हर्च्युअल आयडी (Virtual ID) म्हणतात, तो तयार करता येतो.
सुरक्षा आणि अद्ययावत: या ॲपद्वारे तुम्ही आपले आधार कार्ड लॉक किंवा अनलॉक करू शकता. तसेच, गरज पडल्यास आपले वैयक्तिक तपशील (Personal Details) अद्ययावत (Update) करण्याची सुविधाही मिळते.
हेही वाचा – RBI Guidelines: ऑनलाईन फसवणूक थांबवण्यासाठी RBIचा मोठा निर्णय! आता 'या' पद्धतीने ओळखता येईल बनावट वेबसाईट
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.