Actor Harish Rai : ‘केजीएफ’मधील ‘या’ अभिनेत्याचं निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

अभिनेत्याला घशाचा कर्करोग झाला होता, जो नंतर पोटात पसरला. त्यामुळे त्यांचं शरीर अशक्त झालं होतं आणि द्रव साचल्यामुळे पोट सुजले होते.
Actor Harish Rai : ‘केजीएफ’मधील ‘या’ अभिनेत्याचं निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

Harish Rai Death: कन्नड चित्रपटसृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे. ‘केजीएफ’ (KGF) आणि ‘ओम’ सारख्या गाजलेल्या चित्रपटांमधील दमदार भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते हरीश राय यांचं निधन झालं आहे. ते बराच काळ गंभीर घशाच्या कर्करोगाशी झुंज देत होते. उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गंभीर आजाराशी दीर्घ झुंज

हरीश राय यांना घशाचा कर्करोग झाला होता, जो नंतर पोटात पसरला. त्यामुळे त्यांचं शरीर अशक्त झालं होतं आणि द्रव साचल्यामुळे पोट सुजले होते. गेल्या काही महिन्यांपासून ते अत्यंत गंभीर अवस्थेत होते. चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी सोशल मीडियावर सतत प्रार्थना केल्या होत्या.

हेही वाचा –'बिग बॉस' विजेता सूरज चव्हाणच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा अखेर समोर आलाच! 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिताने थाटात केलं केळवण

स्वतः केली होती आर्थिक मदतीची विनंती

काही महिन्यांपूर्वी त्यांनी एका व्हिडिओद्वारे उपचारासाठी आर्थिक मदतीचं आवाहन केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की एका इंजेक्शनची किंमत तब्बल 3.55 लाख आहे आणि तीन इंजेक्शनच्या सायकलसाठी 10.5 लाखांपर्यंत खर्च येतो. पूर्ण उपचारासाठी सुमारे 70 लाखांची गरज होती. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर गोपी गौडू यांनी त्यांना भेटून हा व्हिडिओ शेअर केला होता. या मुलाखतीत हरीश राय यांनी सांगितलं होतं की, यशने मला याआधी मदत केली आहे, पण मी वारंवार त्याच्याकडे मदत मागू शकत नाही. जर त्याला माझ्या परिस्थितीबद्दल समजलं, तर तो नक्कीच मदतीला धावेल. 

हेही वाचा – Salman Khan Court Notice: सलमान खान अडचणीत, जाहिरात करणं नडलं ; न्यायालयाने बजावली नोटीस

अभिनयाची अविस्मरणीय कारकीर्द

हरीश राय यांनी कन्नड, तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीत अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या. ‘ओम’मधील डॉन राय, ‘केजीएफ’मधील काका, तसेच समारा, बेंगळुरू अंडरवर्ल्ड, जोडिहक्की, राज बहादूर, संजू वेड्स गीता, नल्ला, स्वयंबर अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांनी चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने संपूर्ण दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. एक संवेदनशील, प्रभावी आणि जिद्दी कलाकार म्हणून हरीश राय सदैव प्रेक्षकांच्या हृदयात जिवंत राहतील.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version