Kailash Kher: ‘तुम्ही जनावरांसारखं..’; ग्वाल्हेरमधील कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांच्या गोंधळामुळे कैलाश खेर संतापले, कार्यक्रम अर्ध्यातच बंद

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून कैलाश खेर यांनी माईक हातात घेऊन प्रेक्षकांना कडक शब्दांत फटकारले. गर्दीसमोर सुरक्षा व्यवस्था अपुरी पडली. अखेर गोंधळ थांबत नसल्याने त्यांनी शो अर्ध्यातच सोडला.
Kailash Kher: ‘तुम्ही जनावरांसारखं..’; ग्वाल्हेरमधील कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांच्या गोंधळामुळे कैलाश खेर संतापले, कार्यक्रम अर्ध्यातच बंद

Kailash Kher Stops Performance Amid Crowd Chaos: ग्वाल्हेरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य संगीत सोहळ्यात प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांना प्रेक्षकांच्या उर्मट वागणुकीचा सामना करावा लागला. गुरुवारी रात्री घडलेल्या या प्रकारामुळे संतापलेल्या कैलाश खेर यांनी गाणे अर्ध्यातच थांबवून स्टेज सोडले. चाहत्यांच्या गोंधळामुळे एका चांगल्या कार्यक्रमाचा शेवट अत्यंत कटू अनुभवाने झाला.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजन
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्वाल्हेरमध्ये एका विशेष मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कैलाश खेर यांनी आपल्या सदाबहार गाण्यांनी कार्यक्रमाची सुरुवात उत्तम केली होती आणि प्रेक्षकही त्याचा आनंद घेत होते. मात्र, जसा काळ पुढे सरकला, तसा अतिउत्साही चाहत्यांनी मर्यादा ओलांडण्यास सुरुवात केली.

बॅरिकेड्स तोडून चाहत्यांची स्टेजकडे धाव
काही प्रेक्षकांनी सुरक्षा कठडे (बॅरिकेड्स) तोडून थेट स्टेजच्या दिशेने धाव घेतली. यामुळे वाद्यवृंद आणि महागड्या तांत्रिक उपकरणांना धोका निर्माण झाला होता. चाहत्यांच्या या कृत्यामुळे स्टेजवर एकच चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली आणि आयोजकांचे नियंत्रण सुटले. हे पाहून कैलाश खेर यांचा पारा चढला आणि त्यांनी पोलिसांना पाचारण करण्यास सांगितले.

हेही वाचा – Akshaye Khanna quit Drishyam 3 : ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाला झालं तरी काय? ‘दृश्यम 3 मधून काढता पाय, कारण समोर

कैलाश खेर यांनी सुनावले खडेबोल
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून कैलाश खेर यांनी माईक हातात घेऊन प्रेक्षकांना कडक शब्दांत फटकारले. ते म्हणाले, “आम्ही तुमचा आदर करतो, पण तुम्ही जनावरांसारखे का वागताय? कृपया असे वागू नका. जर कोणीही स्टेजवर किंवा वाद्यांच्या जवळ आले, तर आम्ही कार्यक्रम लगेच बंद करू.” त्यांनी सुरक्षा रक्षकांना परिस्थिती हाताळण्याची विनंती केली, पण गर्दीसमोर सुरक्षा व्यवस्था अपुरी पडली.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
अखेर गोंधळ थांबत नसल्याचे पाहून कैलाश खेर यांनी शो अर्ध्यातच सोडला आणि ते तिथून निघून गेले. 2025 मध्ये अनेक लाईव्ह कॉन्सर्ट झाले, पण या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही प्रेक्षकांच्या बेजबाबदार वागणुकीवर टीका केली असून कैलाश खेर यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.

हेही वाचा – Year Ender 2025 : 2025 मध्ये आर्यन खान ते सोनू सूद यांनी दिग्दर्शनात ठेवले पहिले पाऊल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version