ITR Deadline 2026: आयटीआर भरण्याची तुमची खरी मुदत कोणती? 31 जुलै, 31 ऑगस्ट की 31 ऑक्टोबर? दूर करा सर्व गैरसमज

तुमचे उत्पन्नाचे स्रोत कोणते आहेत आणि वर्षभरात तुम्ही शेअर बाजारात व्यवहार केले आहेत का, यावर तुमची आयटीआर फाइल करण्याची खरी मुदत ठरते.
ITR Deadline 2026: आयटीआर भरण्याची तुमची खरी मुदत कोणती? 31 जुलै, 31 ऑगस्ट की 31 ऑक्टोबर? दूर करा सर्व गैरसमज

ITR Deadline 2026: आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याची शेवटची तारीख म्हणजे 31 जुलै 2026 असा बहुतेकांचा समज असतो. परंतु, प्राप्तिकर कायद्यानुसार प्रत्येक करदात्यासाठी अंतिम मुदत एकच नसते. तुमचे उत्पन्नाचे स्रोत कोणते आहेत आणि वर्षभरात तुम्ही शेअर बाजारात व्यवहार केले आहेत का, यावर तुमची आयटीआर फाइल करण्याची खरी मुदत ठरते. काही करदात्यांसाठी ही मुदत 31 ऑगस्ट 2026 तर टॅक्स ऑडिट लागू असल्यास थेट 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत असू शकते.

31 ऑगस्टपर्यंत कोणाला आयटीआर भरण्याची सवलत?
वित्तीय वर्ष (FY) 2025-26 आणि निर्धारण वर्ष (AY) 2026-27 साठी सर्वच करदात्यांसाठी 31 जुलै ही शेवटची तारीख नाही. ज्या करदात्यांच्या उत्पन्नात व्यवसाय (Business) किंवा पेशा (Profession) यातून होणाऱ्या कमाईचा समावेश आहे आणि ज्यांच्या खात्यांचे 'टॅक्स ऑडिट' (Tax Audit) करणे कायद्याने बंधनकारक नाही, असे करदाते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत आपला आयटीआर भरू शकतात. त्यामुळे बिझनेस किंवा फ्रीलान्सिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बिगर-ऑडिट करदात्यांना आयटीआर फाइलिंगसाठी अतिरिक्त वेळ मिळतो.

हेही वाचा – Maruti Suzuki Car Price Hike: कार खरेदीदारांना मोठा झटका; मारुती सुझुकीच्या गाड्या महागणार; किमतीत 'इतक्या' रुपयांपर्यंत वाढ

एकच ट्रेड केला तरी कशी बदलते डेडलाइन?
तुम्ही पगारदार कर्मचारी (Salaried Employee) असलात, तरी वर्षभरात एकदा जरी इंट्राडे किंवा F&O मध्ये व्यवहार केला असल्यास खालील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे:
– व्यावसायिक उत्पन्न (Business Income): संपूर्ण वर्षात केवळ एकदा जरी 'इंट्राडे ट्रेडिंग' किंवा 'फ्युचर्स अँड ऑप्शन्स' (F&O) मध्ये ट्रेड केला असेल, तर प्राप्तिकर विभाग तुम्हाला व्यावसायिक उत्पन्न असणारा करदाता मानतो.
– मुदतीत बदल: अशा परिस्थितीत तुमची आयटीआर फाइल करण्याची मुदत 31 जुलै ऐवजी थेट 31 ऑगस्ट 2026 होते.
– इंट्राडे ट्रेडिंग नियम: यातून होणारा नफा किंवा तोटा हा 'स्पेक्युलेटिव्ह बिझनेस इनकम' मानला जातो. यातील तोटा फक्त स्पेक्युलेटिव्ह नफ्याशीच (Intra-day Profit) अ‍ॅडजस्ट करता येतो.
– F&O ट्रेडिंग नियम: फ्युचर्स अँड ऑप्शन्समधील व्यवहार हा 'नॉन-स्पेक्युलेटिव्ह बिझनेस इनकम' अंतर्गत मोडतो आणि तो व्यावसायिक उत्पन्नाच्या श्रेणीतच गणला जातो.

31 ऑक्टोबर ही डेडलाइन कोणासाठी लागू होते?
शेअर बाजारात F&O किंवा मोठा व्यवसाय करणाऱ्या करदात्यांनी आपल्या उलाढालीकडे (Turnover) विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जर F&O किंवा व्यवसायातील एकूण उलाढाल टॅक्स ऑडिटच्या निश्चित मर्यादेपेक्षा जास्त झाली, तर खात्यांचे 'टॅक्स ऑडिट' करून घेणे अनिवार्य ठरते. अशा टॅक्स ऑडिट आवश्यक असणाऱ्या प्रकरणांमध्ये आयटीआर फाइल करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2026 ही असेल. त्यामुळे केवळ पगार मिळतो म्हणून आपली डेडलाइन 31 जुलै आहे असे न मानता, आपल्या सर्व उत्पन्न स्रोतांची योग्य तपासणी करूनच आयटीआर भरावा.

हेही वाचा – Farm Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'या' तारखेपूर्वी खात्यात थेट जमा होणार कर्जमाफीचे पैसे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version