Indian Railway : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; IRCTC ची नवी अत्याधुनिक वेबसाईट 15 जुलैपासून होणार सुरू

सध्या देशातील एकूण रेल्वे बुकिंगपैकी तब्बल 88 टक्के बुकिंग ऑनलाईन पद्धतीने होते, त्यामुळे रेल्वे आपली डिजिटल क्षमता 5 पटीने वाढवत आहे.
Indian Railway : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; IRCTC ची नवी अत्याधुनिक वेबसाईट 15 जुलैपासून होणार सुरू

IRCTC New Website Launch on 15th July : आयआरसीटीसी (IRCTC) वेबसाईटवरून तत्काळ तिकीट बुक करताना येणाऱ्या अनंत अडचणींमधून आता कोट्यवधी प्रवाशांची कायमची सुटका होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आगामी 15 जुलैपर्यंत रेल्वेची पूर्णपणे नवीन आणि हाय-टेक वेबसाईट सुरू करण्याची घोषणा केली आहे. या नव्या बदलांमुळे तत्काळ बुकिंगच्या वेळी वेबसाईट हँग होणे, 'कॅप्चा' (Captcha) कोड न येणे किंवा पेमेंट फेल होणे यासारख्या जुन्या समस्या आता इतिहास जमा होणार आहेत.

थेट रेल्वे मंत्र्यांनी ऑन-द-स्पॉट लावला फोन!
या क्रांतिकारी निर्णयाची पार्श्वभूमी जयपूरमधील एका कार्यक्रमात तयार झाली. 'मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी' (MNIT) मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एका विद्यार्थिनीने थेट रेल्वे मंत्र्यांसमोरच आयआरसीटीसीच्या कॅप्चा आणि ओटीपी (OTP) संदर्भातील त्रुटींचा पाढा वाचला. विद्यार्थ्यांची ही थेट तक्रार ऐकताच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंचावरूनच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन जोडला आणि 30 दिवसांच्या आत नवी वेबसाईट तयार करण्याचे आदेश दिले. अधिकाऱ्याने तत्काळ होकार देताच मंत्र्यांनी विद्यार्थ्यांसमोरच 15 जुलैची तारीख जाहीर केली.

एका मिनिटाला 1.5 लाख तिकिटे: 40 वर्षे जुनी सिस्टीम बदलणार
भारतीय रेल्वे आगामी ऑगस्ट महिन्यापासून आपली तब्बल 40 वर्षे जुनी ‘पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम’ (PRS) पूर्णपणे बदलणार आहे. सध्या देशातील एकूण रेल्वे बुकिंगपैकी तब्बल 88 टक्के बुकिंग ऑनलाईन पद्धतीने होते, त्यामुळे रेल्वे आपली डिजिटल क्षमता 5 पटीने वाढवत आहे.

नव्या प्रणालीमुळे येईल गती :
वेगवान तिकीट बुकिंग: सध्याच्या सिस्टीममध्ये एका मिनिटाला केवळ 32,000 तिकिटे बुक होतात, मात्र नवीन यंत्रणेत एका मिनिटाला 1.5 लाखाहून अधिक तिकिटे बुक करता येतील.
चौकशी क्षमता (Enquiry Capacity): तिकीट किंवा ट्रेन चौकशी करण्याची क्षमता प्रतिमिनिट 4 लाखांवरून थेट 40 लाख इतकी प्रचंड वाढवली जाणार आहे.

हेही वाचा – Indian Railways: रेल्वेचा 40 वर्षे जुना नियम बदलणार! आता धावत्या ट्रेनमध्येही मिळणार 'ही' सुविधा; प्रवाशांना होणार मोठा फायदा

नव्या वेबसाईटची वैशिष्ट्ये आणि बदल
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांचा अनुभव अधिक सुटसुटीत करण्यासाठी वेबसाईटमध्ये प्रगत तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
– नो लोडिंग, नो हँग: तत्काळ बुकिंगच्या वेळेस येणारा कोट्यवधी युजर्सचा ट्रॅफिक लोड ही वेबसाईट सहज हाताळेल.
– झटपट कॅप्चा आणि ओटीपी: लॉगिन किंवा पेमेंट करताना अडकणारे कॅप्चा कोड आणि ओटीपी आता एका सेकंदाच्या आत उपलब्ध होतील.
– बहुभाषिक इंटरफेस (Multilingual Interface): सर्वसामान्य नागरिकांनाही सहज वापरता यावी म्हणून वेबसाईट युझर-फ्रेंडली आणि बहुभाषिक असेल.
– फेअर कॅलेंडर आणि सीट निवड: प्रवाशांना वेगवेगळ्या तारखांचे भाडे (Fare Calendar) एकाच ठिकाणी पाहता येईल आणि आवडती सीट निवडणे सोपे होईल.
– सवलतींचे एकत्रीकरण: दिव्यांगजन, विद्यार्थी आणि रुग्णांसाठी असलेल्या विशेष सवलतींचे पर्याय एकाच ठिकाणी सुटसुटीत केले जातील.

'RailOne' सुपर ॲप वापरण्याचे आवाहन
या कार्यक्रमादरम्यान रेल्वे मंत्र्यांनी प्रवाशांना रेल्वेच्या अधिकृत ‘RailOne’ या सुपर ॲपचा जास्तीत जास्त वापर करण्याचा सल्ला दिला. गेल्या वर्षी लाँच झालेल्या या ॲपमध्ये जनरल तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट आणि आरक्षित तिकीट बुकिंग एकत्र करण्यात आले आहे. या ॲपमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर करण्यात आला असून, तुमचे वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता किती टक्के आहे, याचे अचूक भाकीत हे ॲप वर्तवते. सध्या या सुपर ॲपला कोट्यवधी प्रवाशांनी पसंती दिली आहे.

हेही वाचा – Induction Cooking in Indian Railways : IRCTC चा मोठा निर्णय! LPG टंचाईमुळे रेल्वे गाड्यांमध्ये आता सुरू होणार ‘इंडक्शन कुकिंग’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version