मुंबई : राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी नवल बजाज यांची नेमणूक करण्यात आली आहे. १९९५ च्या भारतीय पोलिस सेवेच्या तुकडीचे अधिकारी असलेले नवल बजाज सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर सीबीआयमध्ये सह-संचालकपदावर कार्यरत होते.
महाराष्ट्र केडरचे अधिकारी असलेल्या नवल बजाज यांनी यापूर्वी मुंबई पोलिसांच्या प्रशासन शाखेचे सह-आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. तसेच, मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेत अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभारही सांभाळला आहे. सध्या बजाज राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे काम पाहणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.