Instagram च्या लोगोमध्ये मोठा बदल! 10 वर्षांनंतर बदलला Wordmark, नव्या डिझाइनची सोशल मीडियावर चर्चा

Instagram चे प्रमुख Adam Mosseri यांनी या नव्या डिझाइनची घोषणा केली आहे. 

Instagram च्या लोगोमध्ये मोठा बदल! 10 वर्षांनंतर बदलला Wordmark, नव्या डिझाइनची सोशल मीडियावर चर्चा

Instagram वापरणाऱ्या युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने तब्बल 10 वर्षांनंतर आपल्या Wordmark मध्ये मोठा बदल केला आहे. म्हणजेच अॅपच्या नावासाठी वापरल्या जाणाऱ्या टेक्स्ट लोगोचे डिझाइन आता नव्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे. Instagram चे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी या नव्या डिझाइनची घोषणा केली आहे. 

Instagram ने 2016 पासून वापरात असलेल्या जुन्या cursive स्टाइलमध्ये बदल करत नवीन Wordmark सादर केला आहे. नव्या डिझाइनमध्ये cursive आणि print या दोन्ही शैलींचा मिलाफ करण्यात आला आहे. कंपनीच्या मते, नवीन Wordmark अधिक मॉडर्न, शार्प आणि क्लीन दिसतो. त्याचबरोबर Instagram ची मूळ ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  महत्त्वाचं म्हणजे Instagram च्या प्रसिद्ध रंगीत कॅमेरा आयकॉनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हा बदल केवळ अॅपच्या वर दिसणाऱ्या 'Instagram' या टेक्स्ट Wordmark पुरता मर्यादित आहे. 

दरम्यान, नव्या लोगोवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही युजर्सना नवीन डिझाइन आधुनिक आणि आकर्षक वाटत आहे, तर काहींनी जुन्या cursive लोगोची आठवण काढत नव्या डिझाइनवर नाराजी व्यक्त केली आहे. काही युजर्सनी तर नवीन अक्षररचनेमुळे 'Instagram' वाचताना वेगळाच शब्द दिसत असल्याची गंमतही केली आहे. 

Instagram च्या या नव्या Wordmark सोबत कंपनी आपल्या एकूण Brand Identity मध्येही बदल करत आहे. नवीन टायपोग्राफी आणि इतर डिझाइन घटकांच्या माध्यमातून प्लॅटफॉर्मला अधिक आधुनिक रूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, Instagram ची ओळख बनलेला रंगीत कॅमेरा आयकॉन सध्या कायम ठेवण्यात आला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number