IndiGo Flight Bomb Threat : मुंबईहून दिल्लीकडे निघालेल्या इंडिगोच्या 6E 762 या विमानाला मंगळवारी सकाळी बॉम्बची धमकी मिळाली. त्यानंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पूर्ण आणीबाणी जाहीर करण्यात आली. या विमानात सुमारे 200 प्रवासी होते. इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले की, 30 सप्टेंबर 2025 रोजीच्या उड्डाणादरम्यान सुरक्षेचा धोका निर्माण झाल्यानंतर तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. प्रोटोकॉलनुसार आवश्यक सुरक्षा तपासणी करूनच विमानाला पुढील परवानगी देण्यात आली.
हेही वाचा – H1b Visa Policy New Update : H-1B गोंधळात भारतीयांना जर्मनीचा आधार; ‘स्थिर व उदार’ स्थलांतर धोरणांची हमी
वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, सकाळी 7.53 च्या सुमारास हे एअरबस A321 निओ विमान सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरले. सुरक्षा यंत्रणांनी तपासणी केली असता काहीही तथ्य नसल्याचे आढळले.
An IndiGo Spokesperson says, "A security threat was noticed onboard IndiGo flight 6E 762 operating from Mumbai to Delhi on 30 September 2025. Following the established protocol, we informed the relevant authorities immediately and fully cooperated with them in carrying out the… — ANI (@ANI) September 30, 2025
दरम्यान, प्रवाशांना कमीतकमी गैरसोय होण्यासाठी कंपनीने अल्पोपहाराची सोय केली. तसेच प्रवाशांना नियमित अपडेट्स देण्यात आले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून अधिकृत तपास सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.