Indigo Flight Cancellation : एकीकडे सिंगापूरमध्ये प्रपोज करण्याचा 7 लाखांचा प्लान फसला; तर, दुसरीकडे उच्चायुक्तही अडकले

इंडिगोची विमान उड्डाणे रद्द झाल्यामुळे देशभरात शेकडो लोकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे, तर काहींसाठी ही घटना आयुष्यभर वेदना देणारी आठवण ठरली आहे.
Indigo Flight Cancellation : एकीकडे सिंगापूरमध्ये प्रपोज करण्याचा 7 लाखांचा प्लान फसला; तर, दुसरीकडे उच्चायुक्तही अडकले

Indigo Flight Cancellation : इंडिगोची विमान उड्डाणे रद्द झाल्यामुळे देशभरात शेकडो लोकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे, तर काहींसाठी ही घटना आयुष्यभर वेदना देणारी आठवण ठरली आहे. एका व्यक्तीने सिंगापूर येथे आपल्या प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी तब्बल 7 लाख रुपये खर्चून आखलेला प्लॅन या गोंधळामुळे फसला आहे. इंटरग्लोब एव्हिएशनद्वारे (Interglobe Aviation) संचालित इंडिगो एअरलाइनच्या सततच्या विमानांची उड्डाणे रद्द होत असल्याकारणाने त्रस्त झालेला हा प्रवासी आता कंपनीला ग्राहक न्यायालयात (Consumer Court) घेऊन जाण्याचा विचार करत आहेत.

कनेक्टिंग फ्लाईट सुटली अन् 80 हजार रुपयांचे नुकसान
चंदीगढ येथील या व्यक्तीने संपूर्ण कुटुंबासह सिंगापूर प्रवासासाठी इंडिगोची तिकिटे बुक केली होती. तेथे जाऊन त्याला त्याच्या प्रेयसीला लग्नासाठी प्रपोज करायचे होते. तो 26 नोव्हेंबरला चंदीगढहून दिल्लीला आणि काही तासांच्या अंतराने सिंगापूरसाठी कनेक्टिंग फ्लाईट बुक केली होती. मात्र, दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी निघणाऱ्या विमानाला इंडिगोने वारंवार उशीर केला आणि अखेरीस ते रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी निघाले. या प्रचंड विलंबामुळे (Delay) त्या व्यक्तीची सिंगापूरला जाणारी कनेक्टिंग फ्लाईट सुटली. त्यामुळे त्याला पुन्हा 80 हजार रुपये खर्चून कुटुंबासाठी दुसरी फ्लाईट बुक करावी लागली आणि 7 लाख रुपये खर्चून केलेल्या प्लॅनवर पाणी फिरले.

ग्राहक न्यायालयात जाण्याचा विचार
इंडिगोच्या या अक्षमतेमुळे झालेल्या मानसिक त्रासामुळे आणि आर्थिक नुकसानीमुळे संतप्त झालेल्या या व्यक्तीने रेडिट (Reddit) पोस्टद्वारे आपली व्यथा मांडली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “उशीर झाला. कारण, त्यांच्याकडे प्लेन उडवण्यासाठी पायलट नव्हता! माझ्याकडे आता काय पर्याय आहेत? मी त्यांना ग्राहक न्यायालयात घेऊन जाऊ शकतो का आणि त्यांच्या अक्षमतेमुळे मला झालेला खर्च आणि मानसिक त्रास वसूल करू शकतो का?” या पोस्टवर अनेक रेडिटर्सनी त्याचे समर्थन केले आणि प्रक्रिया पूर्ण करण्याआधी इंडिगोच्या नोडल ऑफिसरला पत्र लिहिण्याचा सल्ला दिला.

हेही वाचा – Indigo Flight Cancellation : 1000 हून अधिक उड्डाणे रद्द; सुप्रिया सुळेंची इंडिगोवर कारवाई करण्याची केंद्र सरकारकडे मागणी

सिंगापूरचे उच्चायुक्तही अडकले
इंडिगोने शेवटच्या क्षणी अनेक उड्डाणे रद्द केल्याचा फटका सिंगापूरचे भारतातील उच्चायुक्त सायमन वोंग (Singapore High Commissioner to India Simon Wong) यांनाही बसला. त्यांना झारखंडमधील देवघर (Deoghar, Jharkhand) येथे एका स्टाफ मेंबरच्या लग्नात (Wedding) हजेरी लावायची होती, पण अचानक आलेल्या अडचणींमुळे ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी आपल्या एक्स हँडलवर फोटो शेअर करत लिहिले की, फ्लाईटच्या अडचणींमुळे ते येऊ शकले नसले तरी, लग्नाच्या आनंदामुळे (Wedding Joy) ते तिथल्या लोकांशी जोडले गेले आहेत.

व्हर्च्युअल उपस्थिती आणि शुभेच्छा
सायमन वोंग हे स्वतः लग्न समारंभात उपस्थित राहू शकले नसले तरी, त्यांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून व्हर्च्युअल पद्धतीने लग्नाला हजेरी लावली आणि शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारे इंडिगोच्या विमानसेवा विसकळीत झाल्यामुळे एका व्यक्तीचा 7 लाखांचा वैयक्तिक प्लान फसला, तर दुसऱ्या बाजूला एका राजकीय प्रतिनिधीलाही आपल्या जवळच्या व्यक्तीच्या महत्त्वाच्या समारंभात प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही.

हेही वाचा – Right to Disconnect Bill 2025: आता कार्यालयीन वेळेनंतर मिळणार ‘नो कॉल-नो ईमेल’ अधिकार? सुप्रिया सुळेंनी लोकसभेत सादर केले नवे विधेयक

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version