China On Battle of Galwan : ‘ही तर सिनेमॅटिक लिबर्टी’; ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटावरून चीनने केलेल्या टीकेला भारताचं प्रत्युत्तर

सलमान खान अभिनीत 'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटावरून भारत आणि चीनमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.
China On Battle of Galwan : ‘ही तर सिनेमॅटिक लिबर्टी’; ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटावरून चीनने केलेल्या टीकेला भारताचं प्रत्युत्तर

China On Battle of Galwan : येत्या काळात पडद्यावर येणाऱ्या सलमान खान अभिनीत 'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटावरून भारत आणि चीनमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. चिनी सरकारी प्रसारमाध्यमांनी या चित्रपटावर 'तथ्ये विकृत' केल्याचा आरोप केल्यानंतर, भारताने 'कलात्मक स्वातंत्र्य' (Artistic Freedom) आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला देत चीनला आरसा दाखवला आहे.

नेमका वाद काय?

सलमान खानचा हा चित्रपट 2020 मध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय लष्कराच्या 16 बिहार रेजिमेंट आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षावर आधारित आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र 'ग्लोबल टाइम्स'ने यावर टीका करताना म्हटले आहे की, चित्रपटातील घटना तथ्यांशी जुळत नाहीत. यावर भारतीय सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले की, 'भारत हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा देश आहे आणि चित्रपट निर्मात्यांना या कलात्मक स्वातंत्र्यानुसार चित्रपट बनवण्याचा पूर्ण अधिकार आहे.'

हेही वाचा – Rashmika-Vijay Wedding: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना अडकणार लग्नबंधनात; 'या' खास ठिकाणी रंगणार शाही सोहळा

चित्रपटाची पार्श्वभूमी

हा चित्रपट शिव अरूर आणि राहुल सिंग यांच्या 'India's Most Fearless 3' या पुस्तकातील कथेवर आधारित आहे. सलमान खानने यात 16 बिहार रेजिमेंटचे शहीद कर्नल बिक्कुमाला संतोष बाबू यांची भूमिका साकारली आहे. 2020 च्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले होते, तर चीनने सुरुवातीला आपली जीवितहानी लपवून नंतर केवळ 4 सैनिक मारले गेल्याचा दावा केला होता.

चीनचा अजब दावा आणि भारताचे प्रत्युत्तर

ग्लोबल टाइम्सने आपल्या लेखात गलवान खोरे चीनच्या हद्दीत असल्याचा खोटा दावा केला आहे. यावर भारतीय सूत्रांनी एनडीटीव्हीशी बोलताना ठणकावून सांगितले की, 'चित्रपट निर्मितीत सरकारची कोणतीही भूमिका नाही. ज्यांना शंका असेल त्यांनी स्पष्टीकरणासाठी भारताच्या संरक्षण मंत्रालयाशी संपर्क साधावा.' 

हेही वाचा – Suryakumar Yadav : "कित्येक क्रिकेटर्स माझ्या मागे, सूर्यकुमार यादव तर…" बोल्ड अभिनेत्रीच्या वक्तव्यामुळे सूर्याकुमार यादव पुन्हा चर्चेत

तणावपूर्ण पार्श्वभूमी

दरम्यान, गलवान खोऱ्यातील या संघर्षानंतर भारत आणि चीनमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) दोन्ही देशांनी मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले आहे. चीनने याआधीही अनेकदा जागतिक व्यासपीठावर खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र भारताने आता सिनेसृष्टीच्या माध्यमातूनही आपली बाजू ठामपणे मांडण्याचे संकेत दिले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version