Indian Agents Target Killing Rizwan Hanif Video: पाकिस्तानमध्ये आश्रय घेणाऱ्या दहशतवादी संघटनांची झोप उडवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. लष्कर-ए-तैयबा या कुख्यात दहशतवादी संघटनेशी संबंधित रिझवान हनीफचा एक वादग्रस्त आणि खळबळजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रिझवान हनीफने जाहीरपणे कबुली दिली आहे की, गेल्या 3 ते 4 वर्षांत अज्ञात मारेकऱ्यांच्या गोळीबारात त्यांच्या संघटनेचे 30 पेक्षा जास्त सहकारी मारले गेले आहेत. दहशतवाद्यांच्याच नेत्याने आपल्या नुकसानाची आणि सहकाऱ्यांच्या मृत्यूची अशी जाहीर कबुली देण्याची ही पहिलीच वेळ मानली जात आहे.
पेशावर ते कराची; अनेक शहरांमध्ये टार्गेट किलिंग
आपल्या चिथावणीखोर भाषणात रिझवान हनीफने आरोप केला आहे की, भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या एजंट्सनी पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील अनेक प्रमुख शहरांमध्ये त्यांच्या लोकांना लक्ष्य केले आहे. पेशावर, कराची, रावळपिंडी, रावळकोट आणि मुझफ्फराबाद या भागांत गेल्या काही वर्षांत एकामागून एक अनेक हल्ले झाले आहेत. अज्ञातांच्या या गुप्त कारवायांमुळे दहशतवादी संघटनांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांना स्वतःच्या भूमीवरही सुरक्षित वाटत नसल्याची भावना हनीफने व्यक्त केली आहे.
पाकिस्तानच्या खोटारडेपणाची जगभर पोलखोल
लष्कर-ए-तैयबा ही संघटना पाकिस्तानात अस्तित्वातच नाही आणि तिच्यावर बंदी घालण्यात आली आहे, असा दावा पाकिस्तान आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर नेहमीच करत आला आहे. मात्र, रिझवान हनीफच्या या उघड वक्तव्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडा पडला आहे. मुंबईतील 2008 मधील भीषण 26/11 हल्ल्यासह भारतावर झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमागे लष्कर-ए-तैयबाचा हात राहिलेला आहे. भारताने पाकिस्तानचे हे सर्व आरोप याआधीही अनेकदा फेटाळून लावले आहेत.
SHOCKING Admission by Lashkar TOP Commander Rizwan Hanif in Pakistan! In a newly surfaced video, he alleges that Indian agencies are using an "unknown gunman model" to eliminate terrorists inside Pakistan. According to his own claim:
• Around 30 Lashkar terrorists have been… — Megh Updates ?™ (@MeghUpdates) August 3, 2026
SHOCKING Admission by Lashkar TOP Commander Rizwan Hanif in Pakistan! In a newly surfaced video, he alleges that Indian agencies are using an "unknown gunman model" to eliminate terrorists inside Pakistan. According to his own claim:
• Around 30 Lashkar terrorists have been… — Megh Updates ?™ (@MeghUpdates) August 3, 2026
‘अज्ञात मारेकरी’ आणि पाकिस्तानमधील घबराट
गेल्या काही वर्षांत पाकिस्तानात जहूर मिस्त्री, रियाज अहमद, ख्वाजा शाहिद, अबू सैफुल्लाह खालिद आणि बिलाल आरिफ सलाफी यांसारख्या अनेक कुख्यात अतिरेक्यांना अज्ञात मारेकऱ्यांनी कंठस्नान घातले आहे. बॉलिवूडमधील ‘धुरंधर’सारख्या चित्रपटांच्या कथानकाप्रमाणेच प्रत्यक्ष पाकिस्तानात अज्ञातांकडून अतिरेक्यांचा खात्मा केला जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या घटनांमुळे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आणि तेथील दहशतवादी नेटवर्क पूर्णपणे हादरले असून सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेही वाचा – Bomb In Peace Rally : भयंकर! तरुणाने स्वतःलाच बॉम्बने उडवले; स्फोटात 8 पोलिसांसह 19 जण ठार, 22 गंभीर जखमी
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.