IAS Neha Marvya: IAS अधिकारी यांच्या बदली होण्याच्या मालिका सुरूच…. 50 दिवसांत बदली, कोण आहेत IAS अधिकारी नेहा मारव्या सिंह?

मध्य प्रदेश कॅडरच्या आयएएस अधिकारी नेहा मारव्या सिंह पुन्हा एकदा बदलीमुळे चर्चेत आल्या आहेत. बदली झाल्यानंतर त्यांनी आयएएस असोसिएशन ग्रुपवर एक पोस्ट टाकून आपली नाराजी व्यक्त केली.

IAS Neha Marvya: IAS अधिकारी यांच्या बदली होण्याच्या मालिका सुरूच…. 50 दिवसांत बदली, कोण आहेत IAS अधिकारी नेहा मारव्या सिंह?

मध्य प्रदेश कॅडरच्या आयएएस अधिकारी नेहा मारव्या सिंह पुन्हा एकदा बदलीमुळे चर्चेत आल्या आहेत. बदली झाल्यानंतर त्यांनी आयएएस असोसिएशन ग्रुपवर एक पोस्ट टाकून आपली नाराजी व्यक्त केली. "एका वर्षात माझी चार वेळा बदली झाली आहे. जर मी कुठेच स्थिर राहिले नाही, तर मी काम कसे करू शकेन?" अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या मेसेजवर ग्रुपच्या सदस्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. याउलट त्यांच्याविरुद्ध बंडासारखे वातावरण तयार करण्यात आले आणि त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. त्यांनी या प्रकरणात आयएएस असोसिएशनकडून हस्तक्षेपाची मागणी केली आहे. सुमारे 15 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांची 11 वेळा बदली झाली आहे. यावेळी त्यांना नवीन पद देण्यात आले आहे. 

नेहा मारव्या यांनी लिहिले की,
"मी या पदावर केवळ 50 दिवस असूनही, 5 सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या यादीत माझे नाव आहे. यामुळे मी अस्वस्थ आहे. एका वर्षात चौथ्यांदा माझे नाव बदलीच्या यादीत आले आहे. मला वाटते की एमपी आयएएस असोसिएशन ग्रुप केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आहे. मला आशा आहे की यावर काहीतरी तोडगा निघेल.  मला माझी नाराजी व्यक्त करायची आहे आणि आशा आहे की यावर काहीतरी तोडगा निघेल. मला पूर्णपणे समजते की एक आयएएस अधिकारी म्हणून, राज्य सरकार मला त्यांच्या इच्छेनुसार कुठेही कर्तव्य बजावण्यास सांगू शकते आणि मी नेहमीच हे आदेश आदराने स्वीकारले आहेत. परंतु मी यावेळी खूप निराश आहे. माझी बदली झाली कारण जे कर्मचारी थेट माझ्या आदेशाखाली नव्हते, परंतु विभागाच्या अखत्यारीत होते, त्यांनी माझ्याविरुद्ध बंड केले, माझ्या डेस्कवर हात आपटले आणि माझी बदली करण्याची धमकी दिली. मी त्यांच्या बेशिस्तपणाबद्दल, फायली रोखून धरण्याबद्दल आणि विभागात मला मिळणाऱ्या वाईट वागणुकीबद्दल योग्य प्रक्रियेद्वारे तक्रार केली, जेणेकरून आवश्यक कारवाई करता येईल. पण त्याऐवजी, माझी बदली करण्यात आली."

हेही वाचा – DA hike 2026: आनंदाची बातमी! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात थेट 60 टक्क्यांपर्यंत घसघशीत वाढ

नवीन ठिकणी तिकडच्या पदाची जबाबदारी व कामकाज समजून घेण्यासाठी अधिकाऱ्याला वेळ लागतो. मात्र, आपली पोस्टिंग अनेकदा दोन-तीन महिन्यांतच बदलते. त्यामुळे आपण केलेल्या कामाचा परिणाम दाखवण्याची संधीच मिळत नसल्याचं त्यांनी म्हटलं. आजपर्यंत आपण शांत राहून परिस्थिती नीट होईल, अशी वाट पाहत होतो. मात्र, आता परिस्थिती आणखी बिघडत असल्याचंही त्या म्हणाल्या. शेवटी त्यांनी ‘Always conspirators win and I fail’ असं म्हणत खंतही व्यक्त केली. नेहा मारव्या सिंह यांचा हा मेसेज सध्या प्रशासकीय विभागात चर्चेचा विषय बनला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number