Eetha Movie: प्रसूतीकळा तरी पाय थांबले नाहीत! ‘ईठा’ चित्रपटाचा काळीज पिळवटून टाकणारा टीझर सोशल मीडियावर व्हायरल; श्रद्धा कपूरच्या अभिनयाचं होतयं कौतुक

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोककलाकार आणि तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर यांच्या संघर्षमय जीवनावर हा चित्रपट आधारित आहे.
Eetha Movie: प्रसूतीकळा तरी पाय थांबले नाहीत! ‘ईठा’ चित्रपटाचा काळीज पिळवटून टाकणारा टीझर सोशल मीडियावर व्हायरल; श्रद्धा कपूरच्या अभिनयाचं होतयं कौतुक

Eetha Movie: बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर लीक झाला असून, त्यातील श्रद्धाचा अभिनय पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोककलाकार आणि तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर यांच्या संघर्षमय जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. श्रद्धा कपूरने या भूमिकेला पडद्यावर हुबेहूब जिवंत केल्याचे टीझरमधून दिसून येत असून, तिचा हा अनोखा अंदाज चाहत्यांच्या मनाला स्पर्श करून गेला आहे.

हेही वाचा – Rhea Kapoor’s Diamond Earring Stolen : रिया कपूरची चिंता वाढली!, विमान प्रवासात तब्बल 1.35 कोटींचे पाचू, हिरेजडित सोन्याचे कानातले गायब

प्रसूतीकळातही रंगमंचावर घुमला घुंगरांचा आवाज; मुलीने व्यक्त केल्या भावना

विठाबाई नारायणगावकर यांच्या कन्या मंगला बनसोडे यांनी या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे. आईच्या स्मृतींना उजाळा देताना त्यांनी लिहिले की, ज्या थोर कलावंताच्या आवाजाच्या जरबेने त्या काळात मंत्र्यांचे ताफे थांबायचे, त्यांनी कलेसाठी दिलेला लढा थक्क करणारा आहे. त्या 9 महिन्यांच्या गरोदर असतानाही त्यांनी सादरीकरण थांबवले नाही. इतकेच नव्हे, तर रंगमंचावर कला सादर करत असतानाच त्यांनी बाळाला जन्म दिला आणि प्रसूतीनंतर अवघ्या काही वेळातच त्या पुन्हा नृत्यासाठी स्टेजवर उभ्या राहिल्या. हा चित्रपट म्हणजे त्यांच्या अलौकिक प्रवासाला वाहिलेली खरी आदरंजली आहे.

नारायणगावच्या कन्येचा प्रवास; ‘या’ दिवशी चित्रपट होणार रिलीज
तमाशाच्याच वातावरणात जन्मलेल्या आणि आपले संपूर्ण आयुष्य लोककलेच्या चरणी अर्पण करणाऱ्या विठाबाईंना त्यांच्या कारकिर्दीत अनेक सर्वोच्च पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. शिवजन्मभूमीचा आणि नारायणगावचा हा गौरव आता मोठ्या पडद्यावर येत असल्याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनी अभिमान व्यक्त केला आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट येत्या 28 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत असून, या ऐतिहासिक लोककलेचा प्रवास अनुभवण्यासाठी रसिक प्रचंड उत्सुक आहेत.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version