मागील काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे बारामती तालुक्यातील जिरायत पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या कांदा, हरभरा, गहू या रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. त्यातच ढगाळ हवामानामुळे देखील या नकदी पिकावर रोगराई पसरली आहे. तसेच शेतकऱ्यांना पीकांवर वारंवार औषध फवारणी करावी लागत आहे. यामुळे शासनाने शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची तातडीने आर्थिक मदत देणे गरजेचे असल्याचे मत बारामतीतीतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.
थंडीच्या ऐन दिवसात मागील काही दिवसांत अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे उभे पीक जमीनदोस्त झाली. अशातच बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांचे रब्बी पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नाशिकसह जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरणासह जोरदार पाऊस बरसला. अनेक सखल भागात पाणी साचले असून नाशिक जिल्ह्यात दाणादाण उडाली आहे. डिसेंबर महिन्यातील या २४ तासांतील पावसामुळे ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. अवेळी आलेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक द्राक्षबागेत पाणी साचल्याने द्राक्ष बागांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.