पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहकांचा इलेक्ट्रिक गाड्यांकडे कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच केंद्र सरकारही इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे भविष्यात पेट्रोल डिझेलच्या गाड्या बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
‘सरकार इलेक्ट्रिक वाहनांचा वेगवान अवलंब करण्याच्या बाजूने आहे. याशिवाय इथेनॉल, बायो-एलएनजी आणि ग्रीन हायड्रोजन यांसारख्या पर्यायी इंधनांचा वापरही सरकारला वाढवायचा आहे’, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. तसेच सरकार इलेक्ट्रिक वाहनांसह पर्यायी इंधनांनाही प्रोत्साहन देत आहेत. मात्र दरम्यान पारंपारिक इंजिन असलेल्या वाहनांची नोंद थांबणार नसल्याचे’ नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.
‘ज्वलनशील इंधनावर चालणाऱ्या वाहनांची नोंदणी थांबवणार नाही. मला वाटते की आम्हाला काहीही अनिवार्य करण्याची गरज नाही’, असेही ते म्हणाले. ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे. त्यामुळे ते म्हणाले, मी स्वत: पुढील महिन्यात हायड्रोजनवर चालणारी गाडी खरेदी करणार आहे. विमानात वापरल्या जाणाऱ्या इंधनात ५० टक्के इथेनॉल वापरण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले आहे.