Gold Silver Rates: सोने-चांदीच्या दरात आठवड्याभरात प्रचंड उसळी; जाणून घ्या बाजारातील नवा ट्रेंड आणि तज्ज्ञांचा सल्ला

जागतिक बाजारातील अस्थिरता आणि कच्च्या तेलाच्या किमती भडकल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीची मागणी वेगाने वाढली आहे.
Gold Silver Rates: सोने-चांदीच्या दरात आठवड्याभरात प्रचंड उसळी; जाणून घ्या बाजारातील नवा ट्रेंड आणि तज्ज्ञांचा सल्ला

Gold Silver Rates: जागतिक घडामोडी आणि राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. मात्र, मागील आठवड्यात अचानक सराफा बाजाराने रिव्हर्स गिअर घेतला असून दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती पुन्हा एकदा उच्चांकी पातळीकडे प्रवास करत आहेत. जागतिक बाजारातील अस्थिरता आणि कच्च्या तेलाच्या किमती भडकल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीची मागणी वेगाने वाढली आहे.  

MCX आणि किरकोळ बाजारातील किमतींची स्थिती
गेल्या 6 दिवसांच्या व्यवहारात घरगुती वायदा बाजार MCX सह किरकोळ बाजारात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. MCX वर सोन्याचा फ्युचर्स दर 1,417 रुपयांनी वाढून 1,43,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. चांदीच्या फ्युचर्स दरात 2,719 रुपयांची वाढ झाली असून तो 2,22,301 रुपये प्रति किलो झाला आहे.
गुड रिटर्नच्या 25 जुलैच्या आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,44,320 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,32,290 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. 18 कॅरेट सोन्याची किंमत 1,08,240 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवण्यात आली असून, किरकोळ बाजारात चांदीचा भाव 2,34,900 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

प्रमुख शहरांमधील सोन्याचे सध्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
देशातील विविध प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतींमध्ये पुढीलप्रमाणे किरकोळ फरक दिसून येत आहे:  
दिल्ली: 22 कॅरेट – 132440 रुपये आणि 24 कॅरेट – 144470 रुपये  
मुंबई: 22 कॅरेट – 132290 रुपये आणि 24 कॅरेट – 144320 रुपये
अहमदाबाद: 22 कॅरेट – 132340 रुपये आणि 24 कॅरेट – 144370 रुपये
चेन्नई: 22 कॅरेट – 132290 रुपये आणि 24 कॅरेट – 144320 रुपये
कोलकाता: 22 कॅरेट – 132290 रुपये आणि 24 कॅरेट – 144320 रुपये
हैदराबाद: 22 कॅरेट – 132290 रुपये आणि 24 कॅरेट – 144320 रुपये

हेही वाचा –  UAN क्रमांक विसरलाय? EPFO पोर्टल आणि उमंग ॲपवरून असा शोधा अवघ्या काही मिनिटांत; पाहा सोपी पद्धत

कोणत्या घटकांमुळे किमतींमध्ये वाढ झाली?
मध्य पूर्वेतील सतत वाढणारा भू-राजकीय तणाव, आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचे (कच्चे तेल) दर पुन्हा 100 डॉलरच्या जवळ जाणे आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या (US Federal Reserve) आगामी बैठकीबाबत असलेला सस्पेन्स या सर्व जागतिक घटकांमुळे सोन्या-चांदीच्या दरांना पाठबळ मिळाले आहे. महागाई आणि बाजारातील अनिश्चिततेपासून संरक्षण मिळवण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँका आणि मोठे गुंतवणूकदार पुन्हा बुलियन मार्केटमध्ये खरेदी करत आहेत.

गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
किमतींमधील या ताज्या उसळीनंतर तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना अत्यंत सतर्कतेने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. ज्यांनी दीर्घकाळासाठी पैसे गुंतवले आहेत, त्यांनी अचानक झालेल्या भाववाढीमुळे किंवा घसरणीच्या भीतीपोटी घाईघाईत विक्री (Panic Selling) करू नये. सध्याच्या रिबाऊंडच्या मागे न धावता, दरांमध्ये पुन्हा स्थिरता येण्याची वाट पाहावी. मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांबाबतच्या निर्णयावर सोन्या-चांदीची पुढील दिशा अवलंबून असणार आहे.

हेही वाचा – Aadhaar App: आता एकाच मोबाईलमध्ये जोडता येणार 5 जणांचे आधार कार्ड; 'UIDAI'च्या नव्या फीचरमुळे फोटोकॉपी अन् कागदपत्रांच्या कटकटीतून होणार मुक्ती

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version