काही दिवसांपूर्वी सोने-चांदीच्या दराने उसळी मारलेली असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोने-चांदीच्या दरात काही प्रमाणात घसरण झालेली आहे, यामुळे गणेशोत्सवात सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी व गुंतवणुकीदारांसाठी मोठी संधी चालून आली आहे. आज 7 सप्टेंबर, 2026 रोजी 24 कॅरेट 1 तोळा सोन्याचे दर 650 रुपयांनी घसरले असून आजची किंमत 1,54,150 इतकी आहे. तर चांदीचा भाव प्रति ग्रॅम 249.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,49,900 रुपये आहे. आदल्या दिवसाच्या प्रति ग्रॅम 250 रुपयांच्या दराच्या तुलनेत चांदीच्या दरात प्रति ग्रॅम 0.10 रुपयांची घट झाली. किलोग्रॅमनुसार, दरात 100 रुपयांची घट झाली. तसेच स्थानिक कर, पुरवठा खर्च आणि इतर शुल्कांसारख्या घटकांमुळे शहरांनुसार आणि सराफांनुसार सोन्याच्या दरात फरक असू शकतो.
24k कॅरेट सोन्याचे दर
1 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 15,445
8 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 1,23,320
10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 1,54,150
100 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 15,41,500
22k कॅरेट सोन्याचे दर
1 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 14,130
8 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 1,13,040
10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 1,41,300
100 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 14,13,000
18k कॅरेट सोन्याचे दर
1 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 11,589
8 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 92,488
10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 1,15,610
100 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 11,56,100
टीप: हे सोन्याचे सूचक दर आहेत. जीएसटी, टीसीएस, घडणावळीचे शुल्क आणि इतर लागू कर समाविष्ट नाहीत.
जागतिक सोने आणि चांदीच्या किमती या अमेरिकन डॉलर आणि भारतीय रुपयातील चढ-उतार, व्याजदर, महागाई आणि आर्थिक परिस्थिती, भू-राजकीय घडामोडी, गुंतवणूकदारांची मागणी, आयात शुल्क, कर आणि इतर देशांतर्गत खर्च, औद्योगिक मागणी याबरोबरच आंतररराष्ट्रीय पातळीवरील युद्धजन्य परिसथिती यांवर अवलंबून असतो. विशेषतः चांदीचे दर हे औद्योगिक मागणीतील बदलांनुसार बदलतात, कारण या धातूचा वापर इलेक्ट्रॉनिक्स, उत्पादन आणि विविध तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो.