Gold Rate Today: ग्राहकांची चांदी! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण; 10 तोळ्यांमागे 13,600 रुपये वाचणार

सोन्याचे दर लक्षणीयरीत्या कमी झाल्यामुळे ग्राहकांसाठी ही खरेदीची उत्तम संधी निर्माण झाली आहे.
Gold Rate Today: ग्राहकांची चांदी! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण; 10 तोळ्यांमागे 13,600 रुपये वाचणार

Gold -Silver price Today: सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या नागरिकांसाठी सलग दुसऱ्या दिवशी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट अशा तिन्ही प्रकारच्या सोन्याचे दर लक्षणीयरीत्या कमी झाल्यामुळे ग्राहकांसाठी ही खरेदीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. सोन्याच्या दरात घसरण सुरू असली, तरी आज चांदीच्या दरात मात्र कोणताही मोठा बदल झालेला नाही, म्हणजेच चांदीचे दर स्थिर आहेत.

24 आणि 22 कॅरेट सोन्याचे आजचे ताजे दर
गुड रिटर्न्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, आज 24 कॅरेटच्या 10 तोळे सोन्याच्या दरात तब्बल 13,600 रुपयांची घसरण झाली आहे, ज्यामुळे 10 तोळे सोन्यासाठी आता 14,52,600 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 24 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याचा दर 1,360 रुपयांनी स्वस्त होऊन तो 1,45,260 रुपयांवर आला आहे. याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्यामध्येही मोठी कपात झाली असून 1 तोळ्याचा दर 1,250 रुपयांनी घसरून 1,33,150 रुपये झाला आहे, तर 22 कॅरेटचे 10 तोळे सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 13,31,500 रुपये खर्च करावे लागतील.

हेही वाचा – EPFO Portal Upgrade: PF धारकांनो लक्ष द्या! UAN ॲक्टिव्हेशनचा नियम बदलला; आता पोर्टलऐवजी 'या' ॲपचा करावा लागणार वापर

18 कॅरेट सोन्याचे दर आणि चांदीची स्थिती
उच्च शुद्धतेच्या सोन्यासोबतच मध्यम बजेट असणाऱ्या ग्राहकांच्या आवडीचे 18 कॅरेटचे सोनेही आज स्वस्त झाले आहे. 18 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याचा भाव 130 रुपयांनी कमी होऊन तो 1,08,940 रुपये इतका झाला आहे, तर 10 तोळ्यांमागे तब्बल 10,300 रुपयांची घसरण झाल्याने आज 18 कॅरेटचे 10 तोळा सोने 10,89,400 रुपयांना उपलब्ध आहे. तर, चांदीच्या किमती आज स्थिर असून बाजारात 1 ग्रॅम चांदी 245 रुपयांना विकली जात आहे. 1 किलो चांदीचा दर 2,45,000 रुपयांवर कायम आहे.

ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण
लग्नसराई किंवा सणासुदीच्या काळात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही दरवाढ थांबणे आणि सलग दुसऱ्या दिवशी दर घसरणे हा मोठा दिलासा मानला जात आहे. आज बाजारात जाताना ग्राहकांनी आपल्या बजेटनुसार या नव्या दरांचा अंदाज घेऊनच खरेदीसाठी पाऊल टाकावे. किंमत आणखी कमी होणार की पुन्हा वाढणार याकडे आता बाजार तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – LNG Supply: देशातील गॅस पुरवठा पूर्ववत; केंद्र सरकारकडून नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावरील आपत्कालीन निर्बंध अखेर मागे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version