Gold Rate Today: ग्राहकांसाठी सुवर्णसंधी! नवरात्रोत्सवात सोन्याच्या किमतीत मोठी घट; जाणून घ्या आजचे दर

नवरात्रोत्सवात सोन्याच्या किमतीत घट; 22 व 24 कॅरेट सोनं आणि चांदीचा भाव कमी, ग्राहकांसाठी सणासुदीच्या खरेदीसाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.<br/>

Gold Rate Today: ग्राहकांसाठी सुवर्णसंधी! नवरात्रोत्सवात सोन्याच्या किमतीत मोठी घट; जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today: नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून बाजारपेठेत ग्राहकांची खरेदीची लगबग वाढलेली दिसते. परंतु या काळात सर्वसामान्यांना सर्वाधिक महत्त्व असतं ते सोन्या-चांदीच्या किमतींना. विशेषतः नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या सणानिमित्त अनेक कुटुंबं दागिने खरेदी करण्यास प्राधान्य देतात. याच पार्श्वभूमीवर आजच्या सोन्याच्या भावाने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.

सतत वाढणाऱ्या सोन्याच्या दरांमुळे मागील काही दिवसांपासून ग्राहक निराश होते. पण नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतींमध्ये झालेली घट ही सुखद ठरली आहे. आज मल्टिकमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर सोन्याच्या वायद्याची किंमत तब्बल 350 रुपयांनी घसरून 1,13,500 रुपये झाली आहे. इतक्या दिवसांनंतर सोन्याचा दर कमी झाल्याने बाजारात खरेदीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे.

हेही वाचा: UPI Payment: UPI पेमेंट सिस्टीममध्ये मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून 'ही' सुविधा होणार बंद

22 कॅरेट सोन्याचा दर

सराफा बाजारात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोनं 1,05,750 रुपये या दराने उपलब्ध आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव आणि ठाणे या सर्व प्रमुख शहरांमध्ये हा दर सारखाच आहे.

24 कॅरेट सोन्याचा दर

तर शुद्ध म्हणजेच 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम 1,15,370 रुपये इतकी नोंदवली गेली आहे. या दरातही सर्व शहरांमध्ये एकसारखाच भाव आहे.

चांदीचाही दर कमी

फक्त सोनंच नाही तर चांदीच्या भावातही घट झाली आहे. एक किलो चांदीचा दर 1,40,000 रुपये इतका आहे. मागील काही दिवसांपासून चांदीही महागलेली होती, मात्र आता त्याच्या किमतीत झालेली घसरण हीही ग्राहकांसाठी चांगली बातमी ठरली आहे.

हेही वाचा: Cheapest Gold Countries: सोनं घ्यायचंय? मग फक्त दुबईच नाही, या 7 देशांतही आहे स्वस्त सोनं; जाणून घ्या

ग्राहकांसाठी सुवर्णसंधी

सोन्याच्या दरातील घसरण ही नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीदारांसाठी फायदेशीर मानली जात आहे. सणासुदीच्या काळात दागिने खरेदी करणे हा शुभ मानला जातो. त्यामुळे आज ज्या कुटुंबांनी सोनं घेण्याचा बेत आखला होता, त्यांच्यासाठी ही योग्य वेळ ठरू शकते.

बाजारातील वातावरण

सराफा व्यापाऱ्यांच्या मते, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि डॉलर-रुपया विनिमय दराचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर होत आहे. जागतिक बाजारातही सोनं स्थिर आहे आणि भारतात उत्सवाच्या काळात मागणी वाढल्याने दरांमध्ये चढ-उतार दिसून येतात.

एकंदरीत, नवरात्रोत्सवात सोन्याच्या आणि चांदीच्या भावात आलेली ही घसरण ग्राहकांसाठी सुवर्णसंधी ठरत आहे. लग्नसराईचा हंगाम आणि दिवाळी जवळ येत असल्याने येत्या काही दिवसांत खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचा दिवस दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी खास ठरला आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number