Ganesh Chaturthi 2026: यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! आधी कोणाची पूजा करायची? जाणून घ्या योग्य क्रम

Hartalika Ganesh Chaturthi: गणेशोत्सवातील हर गणेशोत्सवातील हरतालिका व्रत हे महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यादिवशी स्त्रिया पूर्ण दिवस उपवास करत फक्त नारळाचे पाणी व खोबरे यांचे सेवन करतात.

Ganesh Chaturthi 2026: यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! आधी कोणाची पूजा करायची? जाणून घ्या योग्य क्रम

Hartalika Ganesh Chaturthi: गणेशोत्सवातील हरतालिका व्रत हे महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यादिवशी स्त्रिया पूर्ण दिवस उपवास करत फक्त नारळाचे पाणी व खोबरे यांचे सेवन करतात. तसेच भगवान शंकराची पूजा करून देवी पार्वतीप्रमाणे चांगला वर मिळावा म्हणून ही उपासना केली जाते. 

परंतु यावर्षी हरतालिका वर गणेश चतुर्थी एकाच दिवशी येत असल्यामुळे आधी कोणाची पूजा करावी? उपवास कधी सोडावा? असा संभ्रम निर्माण झाला आहे, तर जाणून घेऊया शुभ मुहूर्त, पूजेची योग्य वेळ…

हेही वाचा  – भाविकांना हवाय ‘AI बाप्पा’! ग्राहकांच्या अजब मागणीने मूर्तिकारांची डोकेदुखी वाढली; यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळणार नवा ट्रेंड

सर्वप्रथम पूजा कोणाची करावी?

1. गणेशोत्सवातला पहिला दिवस म्हणजे हरतालिका आणि गणेश चतुर्थी, तारीख 14 सप्टेंबर 2026 या दिवशी असून, हरतालिकेच्या पूजेचा मुहूर्त सकाळी 6 वाजून 7 मिनिटांपासून ते 7 वाजून 6 मिनिटांपर्यंत आहे.  तसेच शहरांनुसार काही मिनिटांचा फरक असू शकतो. 
2. त्यानंतर तुम्ही गणपतीची स्थापना करून उपासना करू शकता.
3. ज्या महिला हरतालिकेच्या दिवशी रात्रीच्या वेळी चार प्रहरांमध्ये भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा करतात. त्या सकाळी एक वेळ पूजा करून रात्री आपल्या पद्धतीने पूजन करू शकतात. या उपवासात रात्री जागरण केले जाते.
4. या जागरणात भजन-कीर्तन तसेच भगवान शंकराची आराधना केली जाते.  

(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number