Suresh Kalmadi : पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन; वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन झालं आहे.

Suresh Kalmadi : पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन; वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे : पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून सुरेश कलमाडी यांची तब्येत बिघडली होती. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात सुरेश कलमाडी यांच्यावरती उपचार सुरू होते. आज दुपारी सुरेश कलमाडी यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. 

हेही वाचा : Mumbai Municipal Corporation Election 2026 : मनसेला आणखी एक धक्का! वॉर्ड क्रमांक 194 नाकारणं राज ठाकरेंना पडलं माहागात; भाजप प्रवेश कन्फॉर्म

गेल्या काही काळापासून सुरेश कलमाडी आजारपणामुळे राजकारणापासून दूर होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुणे शहराने एक असा नेता गमावला आहे. ज्याने शहराच्या प्रत्येक प्रश्नावर आपले स्वतंत्र मत मांडले होते. ‘पुणे फेस्टिव्हल’च्या माध्यमातून त्यांनी पुण्यातील कला आणि संस्कृतीला जागतिक स्तरावर नेण्याचे काम केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि मोठा आप्तपरिवार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number