अंबाला : पंजाबमधील अमृतसरहून बिहारमधील सहरसा येथे जाणाऱ्या गरीबरथ एक्सप्रेसमध्ये शनिवारी पहाटेच्या वेळी मोठी दुर्घटना घडली. पंजाबमधील सरहिंद रेल्वेस्थानकावरून सुटल्यानंतर ही एक्सप्रेस अंबाला स्थानकाच्या एक किलोमीटर मागे असताना ही घटना घडली. या दुर्घटनेत एक्सप्रेसचे तीन डबे जळून खाक झाले आहेत.
शनिवारी (18 ऑक्टोबर) सकाळी ही गाडी सरहिंद स्टेशनवरून पुढे जात असताना, ट्रेनच्या एका डब्यातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच ट्रेन तात्काळ थांबवण्यात आली. प्रवाशांनी त्वरित बाहेर धाव घेतल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, आग इतक्या वेगाने पसरली की त्यामुळे ट्रेनचे तीन डबे जळून खाक झाले.
VIDEO | Sirhind, Punjab: A major train accident was averted near Sirhind railway station when a fire broke out in the Garib Rath Express travelling from Amritsar to Saharsa, just half a kilometre ahead of Ambala. The train was halted immediately after smoke was seen billowing… pic.twitter.com/vXwHoqTEJB — Press Trust of India (@PTI_News) October 18, 2025
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत एक महिला प्रवासी जखमी झाली आहे. पहाटे अमृतसरवरून सुटलेल्या या धावत्या ट्रेनच्या एका एसी बोगीला आग लागल्यानंतर तात्काळ ट्रेन थांबवण्यात आली. प्रवाशांनी पटापट ट्रेनमधून उड्या मारल्या. जखमी महिलेला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा – Avalanche Hits Badrinath: बद्रीनाथजवळ हिमस्खलन! कुबेर भंडार हिमनदीचा काही भाग कोसळला; कोणतीही जीवितहानी नाही
सरहिंद जीआरपीचे एसएचओ रतन लाल यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, ट्रेनच्या एका डब्यातून धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे दिसताच ट्रेन थांबवण्यात आली. ट्रेन थांबताच सर्व प्रवाशी घाईघाईने ट्रेनमधून उतरले, ज्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आम्ही आगीच्या कारणांचा शोध घेत आहोत आणि लवकरच यासंबंधीचे निवेदन जारी केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेची माहिती देताना रेल्वे मंत्रालयाने देखील सांगितले की, आज सकाळी 12204 अमृतसर-सहरसा गरीबरथ एक्सप्रेसच्या एका डब्याला पंजाबमधील सरहिंद स्टेशनजवळ आग लागली. आग विझवण्यात आली असून, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.