You Tube AI Trap : सावधान! युट्यूबवर दर 5 पैकी 1 व्हिडीओ बनावट; AI चा वापर करून बनवलेल्या कोट्यवधी व्हिडिओजचा सुळसुळाट

एकीकडे युजर आपल्या फीडमध्ये वाढणाऱ्या या कचऱ्याबद्दल तक्रार करत आहेत, तर दुसरीकडे फेसबुक (Meta) सारख्या कंपन्यांच्या मते, AI कंटेंट हेच सोशल मीडियाचे भविष्य आहे.
You Tube AI Trap : सावधान! युट्यूबवर दर 5 पैकी 1 व्हिडीओ बनावट; AI चा वापर करून बनवलेल्या कोट्यवधी व्हिडिओजचा सुळसुळाट

You Tube AI Traps : युट्यूबवर नवीन खाते उघडताच तुम्हाला 'AI' ने तयार केलेल्या बनावट आणि सुमार दर्जाच्या व्हिडिओंनी घेरले जात असल्याचा एक खळबळजनक खुलासा नुकत्याच झालेल्या संशोधनातून झाला आहे. 'कॅपिंग' (Kapwing) या व्हिडीओ एडिटिंग कंपनीने 15,000 लोकप्रिय चॅनेलचे विश्लेषण केल्यानंतर हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. युट्यूबकडून वारंवार गुणवत्ता सुधारण्याचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याचे यातून समोर आले आहे.

नव्या युजर्सना होतोय 'AI स्लॉप'चा मारा
संशोधनानुसार, जेव्हा एखादा युजर नवीन युट्यूब खाते सुरू करतो, तेव्हा त्याला सुचवल्या जाणाऱ्या (Recommended) पहिल्या 500 व्हिडिओंपैकी 104 व्हिडीओ थेट 'AI स्लॉप' (AI Slop) श्रेणीतील असतात. याला सोप्या भाषेत डिजिटल कचरा किंवा 'ब्रेन रॉट' कंटेंट म्हटले जाते, जो मेंदूला थकवणारा आणि कोणतीही खरी माहिती न देणारा असतो. आश्चर्य म्हणजे, Merriam-Webster डिक्शनरीने तर 2025 या वर्षासाठी 'Slop' या शब्दाला 'Word of the Year' म्हणून घोषित केले आहे.

भारतातील 'बंदर अपना दोस्त' चॅनेलची कोट्यवधींची कमाई
या अहवालात भारताशी संबंधित एक धक्कादायक उदाहरण देण्यात आले आहे. युट्यूबवरील सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या AI स्लॉप चॅनेलचे नाव 'Bandar Apna Dost' असे आहे. या चॅनेलला 2.4 अब्जाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यामध्ये मानवी हालचाली करणारा माकड आणि राक्षसांशी लढणारा हल्कसारखा दिसणारा 'AI' कॅरेक्टर दाखवला जातो. युट्यूबच्या धोरणानुसार अशा व्हिडिओंना 'मॉनेटाइज' करू नये, तरीही हे चॅनेल वर्षाला सुमारे 4.25 दशलक्ष डॉलर्सची कमाई करत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा – Google Lecture Mode: तुमच्या वैयक्तिक नोट्स आता 'ऑडिओ लेक्चर'मध्ये ऐका; गुगलचे नवे फिचर 'लेक्चर मोड' आहे तरी काय?

संशोधनातील धक्कादायक आकडेवारी
– चॅनेलची संख्या: एकूण 15,000 पैकी 278 चॅनेल असे आहेत जे फक्त AI स्लॉप व्हिडीओ अपलोड करतात.
– व्यूज आणि सबस्क्राइबर्स: या केवळ 278 चॅनेलनी मिळून 63 अब्ज व्यूज आणि 22.1 कोटी सबस्क्राइबर्स मिळवले आहेत.
– एकूण कमाई: 'AI स्लॉप' निर्माते जगभरातून वर्षाला सुमारे 117 दशलक्ष डॉलर्सची कमाई करत असावेत, असा संशोधकांचा अंदाज आहे.

प्लॅटफॉर्म्सची दुटप्पी भूमिका
एकीकडे युजर आपल्या फीडमध्ये वाढणाऱ्या या कचऱ्याबद्दल तक्रार करत आहेत, तर दुसरीकडे फेसबुक (Meta) सारख्या कंपन्यांच्या मते, AI कंटेंट हेच सोशल मीडियाचे भविष्य आहे. मार्क जुकरबर्गसारख्या दिग्गजांचे मत आहे की, AI मुळे आशय निर्मिती (Content Creation) सोपी होईल आणि शिफारस प्रणालीमध्ये (Recommendation System) कंटेंटची कमतरता भासणार नाही. जरी युट्यूबने नुकतीच बनावट मूव्ही ट्रेलर्स पसरवणाऱ्या दोन चॅनेलवर कारवाई केली असली, तरी हे 'AI' जंजाळ दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालले आहे.

हेही वाचा – Google New Feature : गुगलचे खास फिचर, आता Gmail Address बदलता येणार, पण असणार 'या' अटी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version