Plane Crash News: टेकऑफनंतर काही सेकंदांतच विमान क्रॅश; भीषण अपघातात विमानातील सगळे प्रवासी मृत्यूच्या दाढेत गडप

देशात अनेक ठिकाणी विमान अपघाताच्या बातम्या घडत असताना मोठ्या विमान अपघाताची बातमी समोर आली आहे.

Plane Crash News: टेकऑफनंतर काही सेकंदांतच विमान क्रॅश; भीषण अपघातात विमानातील सगळे प्रवासी मृत्यूच्या दाढेत गडप

देशात अनेक ठिकाणी विमान अपघाताच्या बातम्या घडत असताना पूर्व फ्रान्समधील टॉम्ब्लेन येथे भीषण अपघात घडला आहे. रविवारी सकाळी पूर्व फ्रान्समधील टॉम्ब्लेन येथे पॅराशूट प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे एक विमान उड्डाणानंतर अवघ्या काही क्षणात कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या भीषण विमान अपघातात 5 विद्यार्थी आणि 5 ट्रेनरसह पायलटचा अशा 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा- Rajgad accident: मुसळधार पाऊस आणि किर्र अंधारात किंचाळ्यांचा थरार! राजगडावर निघालेली ट्रॅव्हल्स दरीत कोसळली; 20 पैकी 18 जण…

समोर आलेल्या माहितीनुसार, पूर्व फ्रान्समधील टॉम्ब्लेन येथे रविवारी सकाळी सुमारे 11 च्या सुमारास नॅन्सी-एसे विमानतळावरून  पॅराशूट प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या विमानाने उड्डाण केले होते. त्यानंतर विमान अचानक नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे विमान सरळ खाली झेपावले आणि धावपट्टीजवळील गवताळ भागात विमान कोसळले. यावेळी हे विमान एका शॉपिंग सेंटरच्या अगदी जवळ कोसळले.

विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता मर्थ-ए-मोडझेल विभागाचे प्रीफेक्ट इव्ह सेगुई यांनी व्यक्त केली आहे.  घटनेची माहिती मिळताच अग्रिशमन दल, वैद्यकीय पथके आणि इतर आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र अपघात इतका भीषण होता की विमानातील कोणालाही जीव वाचवण्याची संधी मिळाली नाही. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number