Dussehra 2025 : यंदा 2 ऑक्टोबर 2025 रोजी शारदीय नवरात्रीची सांगता आणि दसऱ्याचा (विजयादशमीचा) शुभ दिवस आहे. या दिवशी एकमेकांना आपट्याचे पान देऊन 'सोन्याची लयलूट' करण्याची परंपरा आहे. हे सर्वजण उत्साहाने करतात. पण तुमच्या संपत्तीत खऱ्या अर्थाने सोने, चांदी, धन आणि समृद्धीची वाढ व्हावी असे वाटत असेल, तर ज्योतिषशास्त्रात दिलेले काही प्रभावी उपाय कोणालाही न सांगता गुपचूप करा. यामुळे देवी लक्ष्मी आणि कुबेर महाराजांचा तुमच्यावर आशीर्वाद कायम राहील.
दसऱ्याच्या दिवशी संपन्नतेसाठी करा हे उपाय
दसऱ्याच्या शुभ दिवशी आपण वाहने, शस्त्रे, वह्या-पुस्तके यांची पूजा करतो आणि त्यात वृद्धी व्हावी यासाठी प्रार्थना करतो. ही प्रार्थना पूर्ण व्हावी यासाठी दसऱ्याच्या सायंकाळी गुपचूप खालील उपाय करावे:
1. पिवळ्या कापडाचा नारळ उपाय:
यंदा दसरा गुरुवारी येत असल्याने पिवळ्या रंगाचा उपाय करणे अधिक शुभ आहे. पिवळा रंग हे यश, वैभव आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहे, तर श्रीफळ (नारळ) हे संपन्नतेचे प्रतीक मानले जाते.
एका पिवळ्या कापडात पाण्याने भरलेला एक नारळ गुंडाळा. हा नारळ एखाद्या राम किंवा देवीच्या मंदिरात नेऊन ठेवा आणि तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होऊन आर्थिक वृद्धी व्हावी यासाठी मनापासून प्रार्थना करा.
2. तिजोरीतील नारळ आणि लक्ष्मी-कुबेराची पूजा:
– तुमची आर्थिक परिस्थिती कमकुवत असेल, तर दसऱ्याला शस्त्र पूजा आणि वही-पुस्तकांच्या पूजेसोबतच लक्ष्मी माता आणि कुबेर महाराज यांची प्रतिमा (तसबीर) ठेवून त्यांची पूजा करा.
– पूजेत एक श्रीफळ (नारळ) ठेवा आणि गोड पदार्थाचा (गूळ-खोबरे किंवा साखर फुटाणे) यथाशक्ती नैवेद्य अर्पण करा.
– पूजा झाल्यावर हे श्रीफळ तुमच्या कपाटात, तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता, त्याठिकाणी ठेवा. नारळ आतून कोरडा झाल्यावर पुढच्या शुक्रवारी दुसरा नारळ ठेवा आणि बदल घडेपर्यंत हा उपाय करत राहा.
3. कर्जमुक्ती आणि नकारात्मकता दूर करण्याचे उपाय
कर्जमुक्तीसाठी हनुमान उपासना: कर्जमुक्तीसाठी दसऱ्याच्या दिवशी हनुमानाची उपासना करणे अत्यंत फलदायी ठरते.
11 वेळा हनुमान चालिसाचे पठण करावे आणि हनुमान व श्रीराम मंत्राचा जप करून कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करावी. रामभक्त हनुमान तुम्हाला उत्पन्नाचे नवीन मार्ग दाखवून कर्ज फेडण्यासाठी मदत करतील.
4. शनीदोष निवारण:
शनिदोष आणि इतर कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शनी मंदिरात जाऊन राईच्या तेलाचा दिवा लावा.
तसेच, काळे तीळ, उडीद डाळ आणि रुईच्या पानांचा हार शनिदेवाला अर्पण करा. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर केलेला हा उपाय सकारात्मक परिणाम देतो.
हेही वाचा – Dussera 2025 : दसऱ्याला जुळून येतोय गुरु-बुधाचा शुभ संयोग; या राशींना करिअर-व्यवसायात मिळेल मोठं यश
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.