Dussehra 2025 : दसऱ्याचं पूजन आणि रावण दहनासाठी शुभ मुहूर्त जाणून घ्या; धन-समृद्धीसाठीची असा करा योग्य पूजाविधी

दसऱ्याचा सण योग्य मुहूर्तावर साजरा केल्यास तो अत्यंत शुभ फलदायी ठरतो. या वेळी केलेली पूजा आणि रावण दहन व्यक्तीच्या जीवनात विजय, धन आणि समृद्धी घेऊन येते.
Dussehra 2025 : दसऱ्याचं पूजन आणि रावण दहनासाठी शुभ मुहूर्त जाणून घ्या; धन-समृद्धीसाठीची असा करा योग्य पूजाविधी

Dussehra Ravan Dahan Time 2025 : भारतामध्ये प्रत्येक सण-उत्सवामध्ये काही ना काही आध्यात्मिक संदेश असतो. यावर्षी विजयादशमी आणि दसरा हा पवित्र सण 2 ऑक्टोबर 2025 रोजी, गुरुवारी साजरा केला जाणार आहे. हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून ओळखला जातो. याच दिवशी भगवान श्रीरामाने रावणावर विजय मिळवला होता आणि देवी दुर्गेने महिषासुराचा वध करून पृथ्वीला राक्षसांपासून मुक्त केले होते. त्यामुळे या दिवशी भगवान राम आणि माता दुर्गा यांची विशेष पूजा केली जाते.

रावण दहन आणि विजयादशमी 2025 चा शुभ मुहूर्त (Ravan Dahan Time And Vijayadashami Muhurt 2025)
हिंदू पंचांगानुसार, विजयादशमीचा उत्सव अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला असतो. 
– दशमी तिथीची सुरुवात: 1 ऑक्टोबर 2025, सायंकाळी 7 वाजून 01 मिनिटांपासून.
– दशमी तिथीची समाप्ती: 2 ऑक्टोबर 2025, सायंकाळी 7 वाजून 10 मिनिटांपर्यंत.
– विजयादशमी (शस्त्र पूजा) मुहूर्त: 2 ऑक्टोबर 2025, दुपारी 2 वाजून 09 मिनिटांपासून ते 2 वाजून 56 मिनिटांपर्यंत. (या मुहूर्ताची अवधी 47 मिनिटे राहील).
– अपराह्न पूजा वेळ: दुपारी 1 वाजून 21 मिनिटांपासून ते 3 वाजून 44 मिनिटांपर्यंत.
– रावण दहन शुभ मुहूर्त: 2 ऑक्टोबर 2025, प्रदोष कालानंतर, साधारणपणे सायंकाळी 6 वाजून 05 मिनिटांनंतर.

हेही वाचा – Khandeavami 2025 : खंडेनवमी म्हणजेच 'आयुध नवमी'! दसऱ्याच्या आदल्या दिवशी शस्त्रपूजन का करतात?

विजयादशमी पूजन आणि शस्त्र पूजनाची योग्य विधी
विजयादशमी पूजनासोबतच काही लोक याच दिवशी शस्त्रपूजनही करतात. दसऱ्याचा सण योग्य मुहूर्तावर साजरा केल्यास तो अत्यंत शुभ फलदायी ठरतो. या वेळी केलेली पूजा आणि रावण दहन व्यक्तीच्या जीवनात विजय, धन आणि समृद्धी घेऊन येते.
1.  शुद्धीकरण: सर्वात आधी पूजा स्थळ आणि ज्या शस्त्रांची पूजा करायची आहे, ती स्वच्छ करा. या वस्तूंना एका स्वच्छ लाल कपड्यात ठेवून त्यावर गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करा. वाहनांची पूजा करायची असल्यास वाहनही धुवावे.
2.  तिलक आणि अर्पण: शस्त्रांवर हळद, कुंकू आणि चंदनाचा तिलक लावा. त्यावर फुले किंवा हार अर्पण करा.
3.  दीपक आणि नैवेद्य: दिवे लावा आणि अगरबत्ती ओवाळा. यानंतर शमीची पाने, अक्षता (तांदूळ) आणि मिठाईचा नैवेद्य दाखवा.
4.  मंत्र जप: पूजा करताना 'ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी, दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।’ या मंत्राचा जप करा.
यासह, प्रभू श्रीरामाच्या
'रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम:।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोस्म्यहम्।
रामे चित्तलय: सदा भवतु मे भो राम मामुद्धर।

रामरामेति रामेति रमे रामे मनोरमे।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने।

या विजयमंत्राचाही जप करावा.
यामुळे जीवनात प्रत्येक ठिकाणी योग्य त्या यशासह अनेक शुभ गोष्टी घडून येतील. या मंत्रांसह विजय मिळवण्याचा संकल्प घ्या.

दसऱ्याच्या पर्वाचे महत्त्व
दसरा किंवा विजयादशमीचा सण केवळ रावण दहनापुरता मर्यादित नाही. हा सण आपल्याला शिकवतो की, जीवनात कितीही अडचणी आल्या तरी जर आपण सत्य आणि धर्माच्या मार्गावर चाललो, तर विजय निश्चितच मिळतो. याच कारणामुळे विजयादशमीचा हा पवित्र दिवस दरवर्षी लोकांना नवी प्रेरणा देतो.

हेही वाचा – Dussehra 2025 : दसऱ्याला करा धनप्राप्तीचे 'हे' उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न आणि होईल सोन्याची लयलूट!

(Disclaimer : ही बातमी सामान्य माहिती आणि लोकांमध्ये रुजलेल्या श्रद्धेवर आधारित आहे. यातून जय महाराष्ट्र कसलाही दावा करत नाही.)

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version