Russia Ukraine War: ‘मागील महिन्यात 25 हजार मृत्यू; हे थांबलं नाही तर..’ ट्रम्प यांचा तिसऱ्या महायुद्धाचा इशारा

ट्रम्प यांनी दावा केला की, त्यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच, दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या या रक्तपातावर त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
Russia Ukraine War: ‘मागील महिन्यात 25 हजार मृत्यू; हे थांबलं नाही तर..’ ट्रम्प यांचा तिसऱ्या महायुद्धाचा इशारा

Russia Ukraine War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे जगात तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता वर्तवली आहे. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी चिंता व्यक्त केली की, या संघर्षात मागील महिन्यात तब्बल 25 हजार जणांनी आपले प्राण गमावले आहेत, ज्यात सैनिकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या या रक्तपातावर त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

संघर्षावर ट्रम्प यांची भूमिका
ट्रम्प यांनी दावा केला की, त्यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ते म्हणाले, “दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला हा संघर्ष थांबायला हवा. हा संघर्ष रोखण्यासाठी आम्ही काम करत आहोत. मागील महिन्यात 25 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारचे संघर्ष हे तिसऱ्या महायुद्धानंतरच संपुष्टात येतात. प्रत्येक जण असाच खेळ खेळत राहिला, तर तिसरे महायुद्ध आपल्याला टाळता येणार नाही, आणि तेच आम्हाला नको आहे.”

हेही वाचा – Museum Heist : ब्रिटिश काळातील भारतीय ठेवा चोरट्यांच्या हाती; मोठी चोरी नेमकी झाली तरी कुठे?

निष्फळ चर्चा आणि ट्रम्प यांचा त्रागा
डोनाल्ड ट्रम्प यांना रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी होणाऱ्या निष्फळ बैठकांचा देखील कंटाळा आला आहे, असे व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लिविट यांनी सांगितले. लिविट म्हणाल्या, “दोन्ही देशांकडून शस्त्रसंधीसाठी धीम्या गतीने पाऊलं उचलली जात आहेत. शांततेसाठी होणाऱ्या बैठकांमधून काहीही निष्पन्न होत नसल्यानं ट्रम्प (Trump) निराश झाले आहेत.”

शांतता प्रस्तावावर युक्रेनची नाराजी
अमेरिकेने तयार केलेल्या शांतता प्रस्तावावर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी स्वाक्षरी न केल्याने ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. युक्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, अमेरिकेचा हा प्रस्ताव रशियाच्या बाजूने झुकणारा आहे.

चार वर्षांपासूनचा संघर्ष
रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये चार वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. रशियाने युक्रेनला पूर्व युक्रेनमधून सैन्य हटवण्याचा इशारा दिला आहे. तसेच, डोनेट्स्क आणि लुहान्सक हे भाग ताब्यात घेण्यासाठी रशिया चार वर्षांपासून युक्रेनशी संघर्ष करत आहे.

हेही वाचा – Donald Trump: H-1B व्हिसा शुल्कावरून ट्रम्प प्रशासन अडचणीत; 20 अमेरिकी राज्यांची न्यायालयात धाव

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version