Dhurandhar Trailer Out : अभिनेता रणवीरचा रॉ अवतार अन् ॲक्शनची भरमार असलेला धुरंधर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

लांब केस, दाढी आणि रौद्र लूक ट्रेलरमध्ये रणवीर सिंग अक्षरशः धडकी भरवतो. त्याची अॅक्शन सीक्वेन्सेस, दमदार फायटिंग प्रेक्षकांना भुरळ घालते.
Dhurandhar Trailer Out : अभिनेता रणवीरचा रॉ अवतार अन् ॲक्शनची भरमार असलेला धुरंधर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Dhurandhar Trailer Out: रणवीर सिंग पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाकेदार एंट्रीसाठी सज्ज झाला आहे. ‘रॉकी अँड राणी’ चित्रपटाच्या दोन वर्षांनंतर तो आदित्य धर यांच्यासोबतच्या नवीन गँगस्टर ड्रामा ‘धुरंधर’मधून प्रेक्षकांसमोर येत आहे. 5 डिसेंबर रोजी रिलीज होणाऱ्या या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा दमदार ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

रणवीरचा रॉ अवतार आणि हिंसक अॅक्शनची झलक

लांब केस, दाढी आणि रौद्र लूक ट्रेलरमध्ये रणवीर सिंग अक्षरशः धडकी भरवतो. त्याची अॅक्शन सीक्वेन्सेस, दमदार फायटिंग आणि रक्तपाताचे दृश्य ट्रेलरमध्ये स्पष्ट करत आहेत की हा चित्रपट कमकुवत मनाच्या लोकांसाठी नाही. पार्श्वसंगीतातील जोरदार बीट्स ट्रेलरचा इम्पॅक्ट आणखी वाढवतात. या चित्रपटात रणवीरसोबत संजय दत्त, आर. माधवन, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल यांसारखे शक्तिशाली कलाकार आहेत. रणवीरच्या प्रेमाची भूमिका तमिळ अभिनेत्री सारा अर्जुन साकारत आहे.

हेही वाचा – Sushmita Sen: हृदयशस्त्रक्रियेवेळी सुश्मिता सेनची अवस्था होती अत्यंत वाईट अवस्था, भयानक अनुभव शेअर केला

ट्रेलरवर प्रेक्षक आणि सेलिब्रिटींची भरभरून प्रतिक्रिया

ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘रणवीरचा गंभीर लूक पाहून पद्मावतची आठवण झाली,’ असं एका युजरने म्हटलं आहे. तसेच दुसऱ्या एका युजरने “500+ कोटी कमवणारा पोटेन्शियल,” असं म्हटलं आहे. तथापी, फॅन्सनी त्याच्या लूकवरून मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका युजरने “धुरंधर म्हणजे केस वाढवणारे,” अशी केमेंट केली आहे. 

हेही वाचा – S. S. Rajamouli : ‘माझा देवावर विश्वास नाही’, पौराणिक कथांवर ब्लॉकबस्टर फिल्म बनवणाऱ्या राजामौलीवर नेटकरी संतापले

जिओ स्टुडिओज आणि बी62 स्टुडिओज निर्मित हा चित्रपट अॅक्शन, सस्पेन्स, भावना आणि थरार यांचे मिश्रण आहे. “उरी: द सर्जिकल स्ट्राईक” आणि “आर्टिकल 370” सारखे ब्लॉकबस्टर देणारे आदित्य धर यांनी हा चित्रपट लिहिला, दिग्दर्शित केला आणि निर्मितीही केली आहे. ज्योती देशपांडे आणि लोकेश धर यांनी सह-निर्मिती केली आहे. “धुरंधर”ची कथा गँगस्टर वर्ल्डमधील एका गडद आणि रोमांचक प्रवासाकडे प्रेक्षकांना घेऊन जाणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version