Nimisha Pradhan Trolled : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीला ऑनलाईन ट्रोलिंगचा फटका; राजीनाम्यावरून कमेंटस येऊ लागल्यामुळे निमिषा प्रधानने सोडले इन्स्टाग्राम

हे आंदोलन केवळ भारतातच मर्यादित न राहता निमिषा शिक्षण घेत असलेल्या अमेरिकेतील विद्यापीठापर्यंत पोहोचले आहे. यावर अनेक जण टीकाही करत आहेत.
Nimisha Pradhan Trolled : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीला ऑनलाईन ट्रोलिंगचा फटका; राजीनाम्यावरून कमेंटस येऊ लागल्यामुळे निमिषा प्रधानने सोडले इन्स्टाग्राम

Nimisha Pradhan Trolled : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीतील जंतर-मंतर येथे 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) आणि इतर आंदोलकांचे मोठे आंदोलन सुरू आहे. संसदेवरील मोर्चामुळे हे आंदोलन अधिक चिघळले असून, संस्थापक अभिजीत दिपके आणि आंदोलक आपल्या मागणीवर ठाम आहेत. देशात सुरू असलेल्या या राजकीय आणि सामाजिक संतापाची झळ आता थेट शिक्षणमंत्र्यांच्या परदेशात शिक्षण घेतलेल्या मुलीलाही सोसावी लागत आहे. धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी निमिषा प्रधान हिला सोशल मीडियावर युजर्सकडून तीव्र ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

अमेरिकेतील टफ्ट्स विद्यापीठाच्या पोस्टवर युजर्सच्या कमेंट्स
हे आंदोलन केवळ भारतातच मर्यादित न राहता निमिषा शिक्षण घेत असलेल्या अमेरिकेतील विद्यापीठापर्यंत पोहोचले आहे. निमिषा प्रधान हिने 2023 मध्ये अमेरिकेतील मॅसाचुसेट्स येथील प्रसिद्ध 'टफ्ट्स विद्यापीठाच्या फ्लेचर स्कूल ऑफ लॉ अँड डिप्लोमेसी'मधून मास्टर ऑफ लॉची (LLM) पदवी पूर्ण केली आहे. सध्या ती यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरममध्ये सिनिअर असोसिएट म्हणून कार्यरत आहे. आता संतप्त युजर्सने टफ्ट्स विद्यापीठाच्या अधिकृत सोशल मीडिया पेजेसवर जाऊन कमेंट्स करण्यास सुरुवात केली असून, 'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' अशा घोषणांसोबतच निमिषाला विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या यादीतून किंवा संबंधातून सस्पेंड करण्याची मागणी केली जात आहे.

हेही वाचा – Jantar Mantar Protest: 'त्यांनी जंतरमंतरवर यावे किंवा…'; सरकारशी चर्चेसाठी कॉकरोच जनता पार्टीने घातली 'ही' महत्त्वाची अट

'येथील शिक्षण अपयशी म्हणून परदेशात शिकतेय' – नेटकऱ्यांचा संताप
ट्रोलर्सनी निमिषाला टॅग करत अत्यंत तिखट शब्दांत सुनावले आहे. 'भारतातील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे ढासळली आणि अपयशी ठरली आहे हे ठाऊक असल्यामुळेच तू स्वतः परदेशात जाऊन शिक्षण घेतले आहेस,' अशा आशयाच्या कमेंट्स करत युजर्स आपला राग व्यक्त करत आहेत. सतत होणारा मानसिक त्रास, ट्रोलिंगचा अतिरेक आणि कौटुंबिक विषयांवरून सुरू असलेल्या टीकेला कंटाळून अखेर निमिषा प्रधान हिने आपले अधिकृत इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंट बंद केले आहे.

कुटुंबाला वादात ओढण्यावरून सोशल मीडियावर दोन गट
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांच्या कुटुंबाला ओढण्यावरून सोशल मीडियावर मतमतांतरे पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आंदोलक आणि युजर्स शिक्षणमंत्र्यांच्या धोरणांवर आणि त्यांच्या कुटुंबाच्या परदेशी शिक्षणावर बोट ठेवत आहेत, तर दुसऱ्या बाजूला काही सुजाण नागरिकांच्या मते, राजकीय आणि प्रशासकीय वादात मंत्र्यांच्या मुला-मुलींना किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना वैयक्तिकरीत्या ओढणे व ट्रोल करणे चुकीचे आहे. या सर्व घडामोडींमुळे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांवरील राजीनाम्याचा राजकीय दबाव अधिकच वाढला आहे.

हेही वाचा – SC On NEET Protest: 'आमचा वेळ वाया घालवू नका…'; जंतरमंतरवरील लाठीचार्ज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारलं

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version