नवी दिल्ली : देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अवघ्या काही मिनिटांपूर्वी त्यांनी एक्स पोस्टवर राजीनाम्याचे पत्रक जारी केले आहे. त्यांचा राजीनाम तातडीने राष्ट्रपतींद्वारे स्वीकारण्यात आला आहे. देशात नीट पेपर लीक झाल्यानंतर तब्बल २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली देशातील विविधी शहरांमध्ये आंदोलने केली. तर गेल्या महिन्यात सीजेपीने दिल्लीतील जंतर मंतर येथे ६ जूनपासून ठिय्या आंदोलनाची हाक दिली. या आंदोलनाला विविधी क्षेत्रातील लोकांनी, राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला. तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आंदोलनाला समर्थन देत आमरण उपोषण सुरू केले. हे आंदोलन आणि उपोषण दोन प्रमुख मागण्यांसाठी होते. नीट पेपर लीग झाल्यामुळे लाखो विद्यार्थांचे नुकसान झाले असून काहींनी आपले जीवन संपवले. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेचे तीनतेरा वाजवणाऱ्या शिक्षणमंत्र्यांनी याची जबाबदारी स्वीकारावी. यासाठी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनाम द्यावा, ही प्रमुख मागणी आंदोलकांनी केली होती.
यासाठी सीजेपीने २० जुलै रोजी संसदेपर्यंतचा मोर्चा आयोजित केला होता. मात्र त्याच दिवशी दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज केला. यात अनेक आंदोलन जखमी झाले. त्यानंतर मात्र देशभरातून या आंदोलनाला जोरदार पाठिंबा मिळाला. सीजेपीची ताकद आणखीन वाढली. दिवसेंदिवस आंदोलन तीव्र होत जाताना गेल्या दोन दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील आंदोलनाची दखल घेत विद्यार्थ्यांना प्रतिसाद दिला. तसेच जे पी नड्डा यांनी सीजेपीच्या प्रवक्यांशी चर्चा करत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. अखेर आंदोलनाच्या ३५ व्या दिवशी सीजेपीच्या आंदोलनाला यश आले असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याचसोबत भाजप सरकारच्या कार्यकाळात पहिल्यांदा कोणत्यातरी केंद्रीय मंत्र्यांनी राजीनाम दिल्याची घटना घडली.
pic.twitter.com/VSArqS98OJ — Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) July 25, 2026