Defamation Case: समीर वानखेडेंचा आर्यन खानच्या शोवर संताप; निर्मात्यासह नेटफ्लिक्सविरोधात 2 कोटींचा मानहानीचा खटला दाखल

समीर वानखेडे यांनी म्हटले की हा शो 'खोटा, दुर्भावनापूर्ण आणि बदनामीकारक' आहे आणि त्यात अँटी ड्रग्ज अंमलबजावणी संस्थांचे चुकीचे आणि नकारात्मक चित्रण केले आहे.
Defamation Case: समीर वानखेडेंचा आर्यन खानच्या शोवर संताप; निर्मात्यासह नेटफ्लिक्सविरोधात 2 कोटींचा मानहानीचा खटला दाखल

Defamation Case: समीर वानखेडे यांनी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या शोमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा संदर्भ देणाऱ्या कथानकावरून आर्यन खान आणि शाहरुख खान तसेच नेटफ्लिक्स रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडविरुद्ध 2 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. 

समीर वानखेडे यांनी म्हटले की हा शो ‘खोटा, दुर्भावनापूर्ण आणि बदनामीकारक’ आहे आणि त्यात अँटी ड्रग्ज अंमलबजावणी संस्थांचे चुकीचे आणि नकारात्मक चित्रण केले आहे, ज्यामुळे कायदा अंमलबजावणी संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी होऊ शकतो. वानखेडे यांनी या प्रकरणी 2 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावा केला आहे. तसेच ही रक्कम ते कर्करोगाच्या रुग्णांच्या उपचारांसाठी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दान करणार आहेत. 

हेही वाचा – AR Rahman: दिल्ली उच्च न्यायालयाचा ए. आर. रहमानला तात्पुरता दिलासा; ‘या’ खटल्यात एकल न्यायाधीशांचा आदेश रद्द

दरम्यान, वानखेडे यांनी निवेदनात असा दावा केला की, हा शो त्यांची प्रतिष्ठा रंगीत आणि पूर्वग्रहदूषित पद्धतीने बदनाम करण्यासाठी रचली गेली आहे. त्यात ‘सत्यमेव जयते’ घोषवाक्य उच्चारल्यानंतर पात्राने मधली बोट दाखवणे या दृश्यामुळे राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, 1971 च्या तरतुदींचे उल्लंघन झाले आहे.

हेही वाचा – National Awards 2025 : मराठी चित्रपटसृष्टीतील ‘या’ बाल कलाकारांना मिळाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

आर्यन खान प्रकरणातील वानखेडेचा सहभाग

समीर वानखेडे यांनी 2021 मध्ये आर्यन खान प्रकरणातील तपासाचे नेतृत्व केले होते. ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबईच्या किनाऱ्यावरील कॉर्डेलिया क्रूझ जहाजावरून ड्रग्ज सेवनाच्या माहितीवरून आर्यनला अटक करण्यात आली होती. जामिनावर सुटका होण्याआधी आर्यन एका महिन्यापर्यंत तुरुंगात होता. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version