China Criminal Family Case : एकाच कुटुंबातील 11 जणांना मृत्यूदंड! म्यानमारमधील ‘मिंग कुटुंबा’च्या क्रूर गुन्हेगारी साम्राज्याचा अंत

चीनमधल्या एका भयंकर गुन्ह्याच्या प्रकरणात एकाच कुटुंबातील 39 जणांना एकाच वेळी शिक्षा सुनावण्यात आली. यातील 11 जणांंना मृत्यूदंड ठोठावण्यात आला. जाणून घेऊ, काय होते हे प्रकरण..
China Criminal Family Case :  एकाच कुटुंबातील 11 जणांना मृत्यूदंड! म्यानमारमधील ‘मिंग कुटुंबा’च्या क्रूर गुन्हेगारी साम्राज्याचा अंत

बीजिंग : तुम्ही कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा झाल्याचे ऐकले असेल, पण संपूर्ण कुटुंबाला..एकाचवेळी शिक्षा सुनावण्यात आल्याचं तुम्ही ऐकलंय का? त्यातही या कुटुंबातील तब्बल 11 सदस्यांना एकाचवेळी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. यामुळे हे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले आहे. हे भयानक प्रकरण काय होते? ही शिक्षा का सुनावण्यात आली? त्यांचा गुन्हा काय होता, हे जाणून घेतल्यास तुम्हाला हा कुटुंबाने केलेला क्रूरपणा लक्षात येईल. हे प्रकरण आहे म्यानमारच्या शान प्रांतातील सर्वात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या 'मिंग कुटुंबा'चे. या कुटुंबाचे गुन्हेगारी साम्राज्य इतके मोठे झाले होते की, त्यांनी चीनलाही हादरवून टाकले होते.

अख्ख्या शहराला बनवलं होतं गुन्हेगारीचा अड्डा
चीनमधील लौकाइंग (Laukkaing) हे एकेकाळी एक साधे शहर होते, पण मिंग कुटुंबाने या शहराला गुन्हेगारीच्या अड्ड्यात रूपांतरित केले. चीनमध्ये जुगार पूर्णपणे बेकायदेशीर असतानाही, मिंग कुटुंबाने लौकाइंगमध्ये बेकायदेशीर कॅसिनो (Casino) स्थापन केले. 2018 सालापासून या कुटुंबाने येथे मोठे जुगार अड्डे, ड्रग्ज व्यवहार आणि अनेक मोठे ऑनलाइन स्कॅम सेंटर्स (Scam Centers) उघडले. हळूहळू हे केंद्र अब्जावधींच्या उत्पन्नाचे स्रोत बनले.

हेही वाचा – Defence Minister Rajnath Singh: “तुमचा इतिहास आणि भूगोल बदलू”, संरक्षमंत्री राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला कडक इशारा

सामान्य लोकांची फसवणूक आणि क्रूरतेचा कळस 
या केंद्रांमध्ये हजारो लोकांना नोकरीचे आमिष दाखवून तुरुंगात टाकण्यात आले. आत गेल्यावर त्यांना ऑनलाइन फसवणूक करण्यास भाग पाडले जाई. जर त्यांनी काम करण्यास नकार दिला किंवा पळून जाण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना क्रूरपणे मारहाण केली जात असे किंवा ठारही मारले जात असे. असे म्हटले जाते की, एकट्या मिंग कुटुंबाने अशा 10,000 हून अधिक लोकांना कैदेत ठेवले होते. चीनच्या न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, मिंग कुटुंबाने 2015 पासून जुगार, फसवणूक, ड्रग्ज आणि वेश्याव्यवसायातून 10 अब्ज युआन (अंदाजे 1.4 अब्ज डॉलर्स) कमावले होते. हजारो चिनी नागरिक या घोटाळ्याच्या टोळ्यांना बळी पडत होते. संयुक्त राष्ट्रांनी याला घोटाळ्यांची महासाथ म्हटले.

साम्राज्याचा अंत आणि ऐतिहासिक निकाल
2023 मध्ये, म्यानमारच्या शान राज्यातील बंडखोर गटांनी लष्करावर हल्ला केला आणि लौकाइंग शहर ताब्यात घेतले. याच हल्ल्यात कुटुंबप्रमुख मिंग श्वेचांग यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे. उर्वरित कुटुंबातील सदस्यांना पकडण्यात आले आणि हजारो कर्मचाऱ्यांसह त्यांची स्कॅम सेंटर्स चिनी अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आली.

29 सप्टेंबर 2025 रोजी चीनमधील वेन्झोऊ येथील न्यायालयाने या प्रकरणावर ऐतिहासिक निकाल दिला. एकूण 39 जणांना शिक्षा सुनावण्यात आली, ज्यात 11 जणांना मृत्युदंडाची शिक्षा, 5 जणांना मृत्युदंडावर दोन वर्षांची सूट, 11 जणांना जन्मठेपेची आणि उर्वरित सदस्यांना 5 ते 24 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले की, मिंग कुटुंब केवळ गुन्हेगारच नव्हते, तर अनेक निष्पाप लोकांच्या मृत्यूसाठीही ते जबाबदार होते. त्यामुळे या सर्वांना त्यांच्या गुन्ह्यांसाठी इतकी भयानक शिक्षा देण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता.

हेही वाचा – Elon Musk: इतिहासात पहिल्यांदाच! एलन मस्क हे 500 अब्ज डॉलरची संपत्ती मिळवणारे जगातील पहिले अब्जाधीश

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version