गर्भवतीला वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने तिच्या जुळ्या बालकांचा मृत्यू झाला होता. पालघर जिल्ह्यातील मोखाड्यातील अतिदुर्गम बोटोशी गावातील मरकटवाडी इथे ही हृदयद्रावक घटना घडली. एकीकडे देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना आदिवासी पाडे आणि दुर्गम भागात मूलभूत सोयीसुविधा पोहोचलेल्याच नसल्याचं चित्र आहे. गर्भवतीला वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने तिच्या जुळ्या बालकांचा मृत्यू झाला.होता. या गावात रस्ता नसल्याने वंदना बुधर या गर्भवती महिलेला आरोग्य सेवा मिळवण्यासाठी तीन किलोमीटर डोलीतून पायपीट करत दवाखाना गाठावा लागला. जय महाराष्ट्रने १६ ऑगस्ट रोजी या बातमीचा सातत्याने वेध घेतला. या जय महाराष्ट्रने दाखवलेल्या बातमीमुळे विधानभवनात दखल घेतली गेली. पालघरच्या आरोग्य व्यवस्थेचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला आहे.
‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची विरोधी पक्ष नेते अजित पवारांकडून दखल घेतली. गर्भवती महिलेला डोलीतून रुग्णालयात नेल्यामुळे पोटात बालकांचा मृत्यू झाल्याची मुद्दा अजित पवारांनी धरून ठेवला.सात महिने गरोदर असलेल्या वंदना बुधर यांना शुक्रवारी १३ ऑगस्ट रोजी अचानक पोटात दुखायला लागलं. पण घरापासून, पाड्यातून दवाखान्यापर्यंत पोहचण्यासाठी रस्ताच नसल्याने त्यांची मोठी अडचण झाली.
सातव्या महिन्यातच पोटात कळा सुरू झाल्याने आधीच परिस्थिती गंभीर होती. त्यात डॉक्टरांकडे जायचं कसं हा प्रश्न होता. पालघर येथील स्थानिक सामाजित कार्यकर्ते तुकाराम पवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, “मरकटवाडी पाड्यातून जाण्यासाठी रस्ता नसल्याने झोळी करून न्यायची वेळ येते. त्यामुळे उपचार मिळण्यासाठी उशीर होतो. १३ ऑगस्टला आम्ही १०८ नंबरवर फोन करून अॅम्ब्यूलन्स बोलवली पण झोळी करेपर्यंत महिलेने मुलांना जन्म दिला. पुढच्या काही वेळात दोन्ही मुलं दगावली.”