मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत या दोघांची बैठक होणार आहे. प्रस्तावित मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजीनाम्याची इच्छा यावर ते अमित शाह यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यात नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा करतील याची अनेकांना उत्सुकता आहे. राज्यातील मंत्रिमंडळ […]

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत या दोघांची बैठक होणार आहे. प्रस्तावित मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजीनाम्याची इच्छा यावर ते अमित शाह यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यात नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा करतील याची अनेकांना उत्सुकता आहे. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या बैठकीत चर्चा होईल का, याचीही उत्सुकता आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनेक विधानांमुळे वादात सापडलेले राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी सोमवारी अचानकच राज्यपाल पदातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन भाजप आणि राज्य सरकार अडचणीत आले आहे. भाजपचीही अडचण झाली होती. त्यामुळे कोश्यारी यांना हटविण्याची मागणी वेळोवेळी होत होती. विरोधकांनीही राज्यपाल यांच्या विधानावरुन सत्ताधारी शिंदे सरकारला अडचणीत आणले होते. त्यामुळे त्यांच्या जागी आता कोण येणार याबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number