Gold Price Today in India latest update : रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी कपात केल्यानंतर, याचा परिणाम सराफ बाजारात सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) किमतींवर दिसून आला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच शनिवारी, सोन्याच्या किमतीत घट झाली, तर चांदीच्या दरात वाढले. आज रविवार असल्याने मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) बंद आहे. त्यामुळे वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही आणि दर स्थिर आहेत.
देशातील सोन्या-चांदीचे आजचे दर
देशांतर्गत सराफ बाजारात आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 13 हजार 15 रुपये इतका कायम आहे. यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्याचप्रमाणे, 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 11 हजार 930 रुपये इतका आहे, तर 18 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 9 हजार 761 रुपये इतकी आहे. चांदीचे दरही आज स्थिर असून, प्रति किलो चांदीची किंमत 1 लाख 90 हजार रुपये इतकी आहे.
प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे दर
– आज पुणे, मुंबई, कोलकाता, बंगळुरु, हैदराबाद आणि केरळ मध्ये सोन्याचे दर समान आहेत. येथे 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 13 हजार 15 रुपये, 22 कॅरेट सोन्याची किंमत 11 हजार 930 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 9 हजार 761 रुपये इतकी आहे.
– दुसरीकडे, राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 13 हजार 30 रुपये झाली, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 11 हजार 945 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 9 हजार 776 रुपये इतकी झाली आहे.
– चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 13 हजार 135 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा दर 12 हजार 40 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 10 हजार 40 रुपये आहे.
हेही वाचा – RBI Repo Rate: 8.2 टक्के GDP वाढीच्या पार्श्वभूमीवरही RBI ची रेपो दरात कपात
आंतरराष्ट्रीय बाजारातला दर आणि तोळ्याचा दर कसा?
प्रति तोळा सोन्याच्या दरांबद्दल बोलायचं झाल्यास, 24 कॅरेट सोन्याची किंमत 1 लाख 39 हजार 150 रुपये इतकी आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 1 लाख 19 हजार 300 रुपये इतकी आहे. 18 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 97 हजार 610 रुपये इतकी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Gold Market) सोन्याचा स्पॉट प्राईस प्रति औंस (Spot Price Per Ounce) 4 हजार 223.76 डॉलर ($4,223.76) आहे.
चालू आठवड्यात झाली अशी वाढ
चालू आठवड्यात भारतात सोन्याच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. एका आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रुपयांची वाढ झाली, तर 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत 300 रुपयांची वाढ दिसून आली आहे. 7 डिसेंबर रोजी राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 30 हजार 300 रुपये होता. चांदीच्या दरातही या आठवड्यात 5 हजार रुपयांची मोठी वाढ झाली आहे.
हेही वाचा – Income Tax Refund : टॅक्स रिफंड अजून मिळाला नाही? रिटर्न भरल्यानंतरही पैसे मिळण्यात येऊ शकतात 'या' अडचणी
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.