Chamoli Tunnel Accident: काम सुरू असतानाच अचानक स्फोटाचा आवाज; पाण्यासोबत मलबा आला अन् 9 कामगारांनी गमावला जीव, नेमकं काय घडलं?

सुरंगीत अडकलेल्या आणखी सहा कामगारांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Chamoli Tunnel Accident: काम सुरू असतानाच अचानक स्फोटाचा आवाज; पाण्यासोबत मलबा आला अन् 9 कामगारांनी गमावला जीव, नेमकं काय घडलं?

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात अलकनंदा नदीवर सुरू असलेल्या विष्णुगाड-पीपलकोटी जलविद्युत प्रकल्पात गुरुवारी संध्याकाळी भीषण दुर्घटना घडली. प्रकल्पाच्या सुरंगीत मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने अनेक कामगार मलब्याखाली अडकले. या दुर्घटनेत आतापर्यंत नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरंगीत अडकलेल्या आणखी सहा कामगारांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

दुर्घटनेनंतर जखमी झालेल्या कामगारांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दहा जणांवर गोपेश्वर येथील जिल्हा रुग्णालयात, तर एकावर श्रीनगर आणि एका कामगारावर पीपलकोटी येथे उपचार सुरू आहेत. एका जखमीला उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सुरंगीत दलदल आणि मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रात्रीच्या वेळी बचावकार्य काही काळ थांबवण्यात आले होते. तसेच आत ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्याने बचाव पथकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले.

ही घटना १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. त्यावेळी २५ हून अधिक कामगार सुरंगीत काम करत होते. सुरंग सुमारे ३.५ किलोमीटर लांब असून, त्यातील जवळपास १.८ किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली. त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी पॉइंटवर पॅकिंगचे काम सुरू होते. अचानक सुरंगीत मोठा आवाज झाला आणि त्यानंतर पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात मलबा आत येऊ लागला. काही क्षणांतच कामगारांमध्ये घबराट निर्माण झाली आणि सुरंगीत आरडाओरड सुरू झाली.

प्रत्यक्षदर्शी कामगाराच्या माहितीनुसार, सुरंगीत अचानक झालेल्या जोरदार आवाजानंतर वरच्या भागातून पाणी आणि मलब्याचा प्रचंड प्रवाह आला. परिस्थिती लक्षात येण्यापूर्वीच अनेक कामगार मलब्याच्या प्रवाहात अडकले. काही कामगार स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाहेरच्या दिशेने धावले, मात्र त्यांनाही मलब्यातून वाट काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान, ४४४ मेगावॅट क्षमतेच्या या जलविद्युत प्रकल्पाचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आले असून, सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रशासन आणि बचाव पथकांकडून प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number