केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प २०२२ सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये केंद्र अर्थमंत्र्यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. जाणून घ्या, काय आहेत नव्या घोषणा?
कररचना
- नोकरदारांच्या कररचनेत बदल नाही.
- दिव्यांगांसाठी करसवलतीची घोषणा.
- पेन्शन करात सवलत.
- सहकरी संस्थांसाठी १८.५ टक्क्यांवरून १५ टक्के करसवलत.
- कॉर्पोरेट कर अधिभार ३ टक्के घटला.
- छाप्यात मिळालेली संपत्ती सरकारजमा होणार.
कृषीक्षेत्र
- नऊ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली.
- कृषी क्षेत्रासाठी २.३७ लाख कोटीची तरतूद.
- नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणार.
- कृषी क्षेत्रातील स्टार्टअपना मदत करणार.
- तेलबिया आयात कमी करणार.
- तेलाच्या किमती नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न.
- पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर.
- ‘एक उत्पादन, एक रेल्वे स्थानक’ योजना.
डिजिटल चलन आणि क्रिप्टो करन्सी
- आरबीआयचे स्वत:चे डिजिटल चलन असेल.
- क्रिप्टो करन्सी घोटाळ्यावर मोदी सरकारचा तोडग्याचा प्रयत्न
- क्रिप्टो करन्सीच्या उत्पन्नावर ३० टक्के कर.
गुंतवणूक
- मोदी सरकारने भांडवली गुंतवणूक वाढवली.
- आगामी आर्थिक वर्षात भाडंवली गुंतवणूक साडेसात लाख कोटी.
- आगामी वर्षात वित्तीय तूट ६.९ टक्के असेल.
संरक्षण क्षेत्र
- संरक्षण क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवणार.
- खासगी क्षेत्राला संरक्षण क्षेत्रात प्रोत्साहन देणार.
- भारत ६८ टक्के स्वदेशी संरक्षण साहित्य खरेदी करेल.
ई-टेंडर
- केंद्र सरकार ऑनलाईन कामावर भर देणार’
- केंद्र सरकारचे अधिकाधिक कामकाज ई टेंडर पद्धतीने’
शिक्षण वाहिन्या
- शालेय शिक्षणासाठी टीव्ही चॅनलचे जाळे उभारणार.
- देशभरात स्थानिक भाषेतील १०० शिक्षण वाहिन्या सुरू होणार.
- बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी १०० शिक्षण वाहिन्या सुरू होणार.
लघु आणि मध्यम उद्योग
- लघु आणि मध्यम उद्योगासाठी २ लाख कोटींचे अर्थसहाय्य.
- उद्योग आणि दळणवळण वाढीसाठी ‘एक खिडकी योजना’
दमणगंगा-पिंजार प्रकल्पाला गती मिळणार.
पंतप्रधान गतिशक्ती योजनेतून पायाभूत सुविधा विस्तार.
आयुर्विमा महामंडळाचा आयपीओ लवकरच येणार.
येत्या ३ वर्षात नव्यादमाच्या ४०० वंदे भारत गाड्या धावणार.
माहिती तंत्रज्ञान आणि सेवाक्षेत्राला उभारी देणार.