सलमान खानचा बहुचर्चित ‘बिग बॉस 20’ सुरू होण्यासाठी आता काहीच तास शिल्लक असताना शोमधील संभाव्य स्पर्धकांची यादी चर्चेत आली आहे. यंदाच्या सीझनमध्ये मनोरंजन, क्रीडा, संगीत आणि सोशल मीडिया अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील चेहरे एकाच घरात दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सीझनमध्ये नेमके कोणते चेहरे प्रेक्षकांचे मनोरंजन करणार, याची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘डबल वरदान’ या ट्विस्टमुळे यंदाच्या शोची चर्चा आधीपासूनच रंगली आहे. घराची झलक समोर आल्यानंतर आता संभाव्य स्पर्धकांच्या नावांनी सोशल मीडियावरही जोर धरला आहे. मात्र, ग्रँड प्रीमिअरमध्ये अधिकृतपणे कोणाची एंट्री होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चर्चेत असलेली संभाव्य स्पर्धकांची यादी
माही विज: ‘लागी तुझसे लगन’मधील नकुशाच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री. टेलिव्हिजनसोबतच तिने रिअॅलिटी शोजमध्येही सहभाग घेतला आहे.
रिया अहिर: विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित चेहरा म्हणून चर्चेत आलेली रिया आता रिअॅलिटी शोमध्ये आपली बाजू मांडताना दिसण्याची शक्यता आहे.
ईशा रिखी: पंजाबी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून ईशाची ओळख आहे. विविध पंजाबी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे.
अमन गांधी: ‘डी4- गेट अप अँड डान्स’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारा अमन अनेक टीव्ही मालिकांमध्ये झळकला आहे.
कनिका मान: ‘गुड्डन तुमसे ना हो पाएगा’ या मालिकेतील भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली कनिका यापूर्वी ‘खतरों के खिलाडी’मध्येही दिसली आहे.
मेरी कॉम: ऑलिम्पिक पदक विजेती आणि जागतिक स्तरावरील बॉक्सर मेरी कॉमच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. तिची एंट्री झाल्यास शोमध्ये वेगळी रंगत निर्माण होऊ शकते.
गुल्लू उर्फ कुशल तंवर: ‘रोडीज’चा विजेता म्हणून प्रसिद्ध असलेल्या गुल्लूने रिअॅलिटी शोचा अनुभव मिळवला आहे.
तन्मय सिंग उर्फ स्काउट: गेमिंग आणि लाइव्ह स्ट्रीमिंग विश्वातील लोकप्रिय नाव. भारतीय गेमिंग कम्युनिटीमध्ये त्याची मोठी फॅन फॉलोइंग आहे.
अरिश्फा खान: बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात करणारी अरिश्फा टीव्ही तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय आहे.
उदिती सिंग: मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून काम केलेल्या उदितीच्या नावाचीही संभाव्य स्पर्धकांमध्ये चर्चा आहे.
आम्रपाली दुबे: भोजपुरी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. हिंदी टीव्हीपासून प्रवास सुरू केल्यानंतर तिने भोजपुरी चित्रपटांमध्ये विशेष ओळख निर्माण केली.
आसिफ खान: ‘पंचायत’मधील भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या लक्षात आलेला अभिनेता. वेब सीरिज आणि चित्रपटांमध्येही त्याने काम केले आहे.
युंग डीएसए: स्वतंत्र हिप-हॉप आणि रॅप संगीत क्षेत्रातील नाव. शोमध्ये त्याची एंट्री झाल्यास संगीतविश्वाचाही तडका पाहायला मिळू शकतो.
लव गिल: पंजाबी म्युझिक व्हिडिओमधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आणि मॉडेल. अनेक पंजाबी गाण्यांमध्ये ती झळकली आहे.
काझी तौकीर: ‘फेम गुरुकुल’चा विजेता म्हणून लोकप्रिय झालेला गायक. रिअॅलिटी शोचा त्याला पूर्वीपासून अनुभव आहे.
रिथी तिवारी : अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून मनोरंजन क्षेत्रात काम केलेल्या रिथीच्या नावाचीही या सीझनसाठी चर्चा आहे.
रोहेद खान: ‘तेजस’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेला अभिनेता आणि मॉडेल. त्याच्या नावाचीही संभाव्य स्पर्धक म्हणून चर्चा आहे.
अशा प्रकारे अभिनेत्री, अभिनेता, बॉक्सर, गायक, रॅपर, गेमिंग क्रिएटर आणि मॉडेल्स अशा विविध क्षेत्रांतील चेहरे बिग बॉसच्या घरात दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता ग्रँड प्रीमिअरमध्ये यापैकी किती जण प्रत्यक्षात घरात प्रवेश करतात आणि ‘डबल वरदान’ ट्विस्टमुळे नेमके काय घडते, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.