आज सोने-चांदीच्या दरांनी उसळी मारलेली आहे. या दरवाढीला अनेक घटक कारणीभूत आहेत, डॉलर महाग झाला तरी सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळते. तसेच महागाई-व्याजदर, सण-समारंभ व आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे शेअर बाजार पडतो व सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक सोने खरेदी करतात. या सर्व बाबींमुळे सोन्याच्या किंमतींत वाढ होते.
देशांतर्गत बाजारात सोने-चांदी महागले
देशांतर्गत बुलियन मार्केटमध्ये आज सोन्या-चांदीच्या दोन्ही दरात वाढ झाली आहे. MCX वर सोन्याचा भाव 1.53 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास पोहोचला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून ती 2.40 लाख रुपये प्रति किलोच्या आसपास व्यवहार करत आहे.
MCX म्हणजे काय व MCX वर आजचे दर किती?
MCX म्हणजे Multi Commodity Exchange. जिथे सोने-चांदीचा ऑनलाईन व्यवहार होतो, जसे शेअर बाजारात शेअर खरेदी-विक्री होते. हा भाव पुढच्या महिन्यात डिलिव्हरी होणाऱ्या सोन्याचा असतो.
यांवर सोन्याच्या दरात 737 रुपयांची वाढ झाली. सकाळच्या व्यवहारात सोन्याचा भाव ₹1,53,499 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. चांदीच्या दरातही जोरदार तेजी पाहायला मिळाली. सकाळी सुमारे 9 वाजताच्या व्यवहारात चांदी 1,855 रुपयांनी वधारली आणि तिचा भाव ₹2,40,871 प्रति किलोवर पोहोचला.
24 कॅरेट सोने: सुमारे ₹1,54,000 प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट सोने: सुमारे ₹1,41,167 प्रति 10 ग्रॅम
18 कॅरेट सोने: सुमारे ₹1,15,500 प्रति 10 ग्रॅम
चांदी: सुमारे ₹2,40,170 प्रति किलो
सोन्या-चांदीच्या दरात दररोज चढ-उतार होत असल्याने, खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या शहरातील ताजा दर आणि संबंधित विक्रेत्याकडील किंमत तपासणे गरजेचे आहे.